Ind vs WI 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये ‘या’ खेळाडूंना मिळणार डच्चू? विराट, रोहितची एन्ट्री!

Ind vs WI 3rd ODI : कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देत बसण्यात आलं होतं. मात्र संघाला याचा मोठा फटका बसला होता. युवा खेळाडू अपयशी ठरल्याने टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला होता.

Ind vs WI 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 'या' खेळाडूंना मिळणार डच्चू? विराट, रोहितची एन्ट्री!
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 7:22 PM

 मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या बुधवारी संध्याकाळी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून जो संघ जिंकेल तो मालिका जिंकणार आहे. टीम इंडियाचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पराभव झाला होता. टीम मॅनेजमेंटल प्रयोग करणं महागात पडलं होतं. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देत बसण्यात आलं होतं. मात्र संघाला याचा मोठा फटका बसला होता. युवा खेळाडू अपयशी ठरल्याने टीम इंडियाला हा सामना गमवावा लागला होता.

तिसऱ्या आणि अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे संघात परतणार असल्याचं मुख्य कोच राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र संघामधील काही खेळाडूंना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. कारण टीम इंडियाला हा सामना गमावणं परवडणार नाही. मालिका हातातून जाऊ शकते त्यासाठी टीम इंडियाची टीम मॅनेजमेंट खाली दिलेल्या खेळाडूंना संघातून डच्चू देण्याची शक्यता आहे.

या खेळाडूंना मिळणार डच्चू?

संजू सॅमसन याला संधी देऊनही त्याला सोनं करता आलं नाही. त्यानंतर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये अपयशी ठरत असलेल्या सूर्यकुमार यादवलाही दोन सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या दोन खेळाडूंना बाहेर काढण्याची जास्त शक्यता आहे. यासोबतच मागील सामन्यामधील पदार्पणवीर मुकेश कुमार याच्या जागी जयदेव उनाडकट यासा संधी दिली जावू शकते. दोन्ही संघ आपली सर्व ताकद पणाला लावतील आणि सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतील.

दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये पात्र न झालेल्या विंडिज संघाकडून झालेल्या पराभवामुळे क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. वर्ल्ड कपला काही दिवस बाकी असताना अशा प्रकारे पराभव होणं भारतासाठी चिंतेची बाब आहे.

संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.