IND vs WI 3rd ODI : तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघांची संभाव्य प्लेइंग 11 जाहीर

IND vs WI 3rd ODI : आजचा तिसरा सामना ज्या मैदानावर होणार आहे त्यावर एकही कसोटी आणि एकदिवसीय सामना झालेला नाही. पहिल्यांदाच मेन्स वनडे सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाला पहिला सामना जिंकण्याची मोठी संधी आहे.

IND vs WI 3rd ODI : तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज संघांची संभाव्य प्लेइंग 11 जाहीर
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 4:54 PM

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील तिसरा एकदिवसीय सामना आज संध्याकाळी होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असून जो जिंकेल तो संघ मालिका जिंकणार आहे. आता मालिका 1-1 ने बरोबरीत असून शेवटच्या सामन्यामध्ये कोणता संंघ बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात आपली सर्व ताकद पणाला लावताना दिसतील.

पहिला सामना टीम इंडियाने 5 विकेट्सने आणि तर दुसरा सामना वेस्ट इंडिजने ६ विकेट्सने जिंकला होता. तिसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाचे मुख्य खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे मैदानात उतरतील. दुसऱ्या सामन्यामध्ये दोघांनाही विश्रांती देण्यात आली होती. मात्र याचा फटका संघाला बसला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये भारताला याचा फटका बसलाय.

आजचा तिसरा सामना ज्या मैदानावर होणार आहे त्यावर एकही कसोटी आणि एकदिवसीय सामना झालेला नाही. पहिल्यांदाच मेन्स वनडे सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याआधी वुमन्स संघाचे एकदिवसीय सामने झाले आहेत. या मैदानाचा पिच रिपोर्ट पाहिला तर फलंदाजी आणि गोलंदाजीलाही खेळपट्टी पूरक आहे. मात्र जास्त करून टॉस जिंकणारा संघ प्रथन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतो.

तिसऱ्या सामन्यासाठी संभाव्य संघ :-

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुकेश कुमार आणि उमरान मलिक.

वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन – ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, अलिक अथांजे, शाई होप (कर्णधार आणि यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी आणि जेडेन सील्स.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.