Ind vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी-20 सामन्यात 17 वर्षांचा इतिहास बदलणार? पंड्यावर मोठी जबाबदारी!

IND vs WI 3rd T-20 : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे. आजच्या सामन्यानंतर जवळपास 17 वर्षांचा इतिहास बदलला जाण्याची शक्यता आहे.

Ind vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी-20 सामन्यात 17 वर्षांचा इतिहास बदलणार? पंड्यावर मोठी जबाबदारी!
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 8:30 AM

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंंडिजमधील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील तिसरा सामना आज पार पडणार आहे. आजचा सामना म्हणजे पूर्ण मालिकेचा निकाल आहे, कारण वेस्ट इंडिज संघाकडे 2-0 ची आघाडी असून आजच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला तर त्यांच्याकडे विजयी आघाडी असणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये टीम इंडियाला विजय मिळवावाच लागणार आहे. इतकंच नाहीतर आजच्या सामन्यानंतर जवळपास 17 वर्षांचा इतिहास बदलला जाणार आहे.

17 वर्षांचा कोणता इतिहास बदलला जाणार?

टीम इंडियाचा आजच्या सामन्यामध्ये पराभव झाला तर गेल्या 17 वर्षांनंतर कॅरेबियन संघाकडून टीम इंडियाचा तीन सामन्यात पराभव होणार आहे. 2006 साली वेस्ट इंडिज संघाकडून टीम इंडियाचा पराभव झाला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज संघाने भारतामध्ये येत विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने कोणताही मालिका गमावली नाही.

जर आजच्या सामन्यात पराभव झाला तर हा 17 वर्षांता रेकॉर्ड मोडला जाणार आहे. त्यासाठी हार्दिक पंड्या आणि कंपनीला सांघिक कामगिरी करावी लागणार आहे. सलग दोन टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये हातातोंडाशी आलेल घास विंडिजच्या तळाच्या फलंदाजांनी ओढून घेतला होता.

दरम्यान,  आजच्या सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकतो. हार्दिक पंड्या सलामीवीर शुबमन गिल याच्या जागी संघात यशस्वी जयस्वाल याला संधी देऊ शकतो. मागील दोन्ही सामन्यामध्ये गिल अपयशी ठरत असलेला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ऑल राऊंडर खेळाडू अक्षर पटेल याच्या जागी वेगवान गोलंदाजाला संधी मिळण्याचीही शक्यता आहे. कारण अक्षरला गेल्या सामन्यात एकही ओव्हर पंड्याने दिली नव्हती.

तिसऱ्या टी-20 साठीची संभाव्य प्लेइंग 11

कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.