IND vs WI 3rd T20 Match Report : रोहितच्या दुखापतीचा सूर्यकुमारनं घेतला बदला, यादवची जोरदार फटकेबाजी, इंडिजला नमवलं

रोहितच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवनं कॅरेबियन गोलंदाजांवर जोरदार फटकेबाजी करत 44 चेंडूत 76 धावांची अप्रतिम खेळी खेळली. भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात रोहित शर्मा अल्झारी जोसेफच्या चेंडूवर मोठे फटके मारत होता.

IND vs WI 3rd T20 Match Report : रोहितच्या दुखापतीचा सूर्यकुमारनं घेतला बदला, यादवची जोरदार फटकेबाजी, इंडिजला नमवलं
रोहितच्या दुखापतीचा सूर्यकुमारनं घेतला बदलाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 7:15 AM

नवी दिल्ली : तिसऱ्या T20I मध्ये (IND vs WI 3rd T20) भारतानं नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी दिली. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) झटपट खेळीच्या जोरावर भारतानं (India) तिसऱ्या T20 सामन्यात यजमान वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-1 नं आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना विंडीज संघाने निर्धारित षटकात 5 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने प्रथम तीन विकेट्सच्या मोबदल्यात 36 चेंडू राखून लक्ष्य गाठले. 19 धावांवर कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने भारताला मोठा धक्का बसला. रोहित निवृत्त दुखावला. त्याने मैदान सोडल्यानंतर श्रेयस अय्यरने सूर्यकुमार यादवला चांगली साथ दिली आणि दोघांनी मिळून डाव 105 धावांपर्यंत नेला. दरम्यान, सूर्यकुमारच्या फटकेबाजीची चांगलीच चर्चा काल होती. त्यानं इंडिजला चांगलंच धुतलं. तर विजय खेचून आणला.

बीसीसीआयचं ट्विट

दीड ओव्हरमध्ये रोहित जखमी

रोहितच्या दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवनं कॅरेबियन गोलंदाजांवर जोरदार फटकेबाजी करत 44 चेंडूत 76 धावांची अप्रतिम खेळी खेळली. भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात रोहित शर्मा अल्झारी जोसेफच्या चेंडूवर मोठे फटके मारत होता. पण त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूनंतर तो अडचणीत दिसला आणि त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. रोहितने मैदान सोडण्यापूर्वी 5 चेंडूत 11 धावा केल्या होत्या.

सूर्याने काइल मेयर्सला उत्तर दिले

प्रथम फलंदाजी करताना काइल मेयर्सच्या 73 धावांच्या खेळीच्या जोरावर विंडीजनं भारतासमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्न केला. काइलशिवाय ब्रेंडन किंग, कर्णधार निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर यांना 23 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. भुवनेश्वर कुमारनं 35 धावांत 2 तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगनं 1-1 बळी घेतला. सूर्यानं मेयर्सच्या खेळीला त्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिले. 105 धावांवर भारताला पहिला धक्का अय्यरच्या रूपाने बसला, जो केवळ 24 धावा करू शकला. अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर भारताला 135 धावांवर सूर्यकुमारकडून दुसरा धक्का बसला. 2 विकेट पडल्यानंतर हार्दिक पांड्यासह ऋषभ पंतला विजयाची जबाबदारी घ्यायची होती, पण पंड्या 4 धावा करून बाद झाला. पंतने 26 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. त्याचवेळी दीपक हुडाने 7 चेंडूत नाबाद 10 धावा केल्या.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.