Ind vs wi 3rd T20 : तिसऱ्या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव याचं सर्वात वेगवान ‘शतक’
सूर्यकुमार यादव याची 83 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी आणि तिलक वर्मा याच्या नाबाद 49 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यामध्ये सूर्याची बॅट तळपली, पठ्ठ्याने एकहाती सामना काढला.
मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात कॅरेबियन संघाचा 7 विकेट्सने पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडिज संघाने 159-5 धावा केल्या. यामध्ये , ब्रँडन किंग 42 धावा आणि रोव्हमन पॉवेल 40 धावा केल्या. तर कुलदीप यादवने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याची 83 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी आणि तिलक वर्मा याच्या नाबाद 49 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. या सामन्यामध्ये सूर्याची बॅट तळपली पठ्ठ्याने एकहाती सामना ओढला.
सूर्यकुमार यादवचं शतक
सूर्यकुमार यादव याने आपल्या खेळीमध्ये 10 चौकार आणि 4 षटकार मारले. गडी एकदा सेट झाला की संपला, मागील दोन टी-20 सामन्यांमध्ये फेल गेलेल्या सूर्याने त्याचा खरी ओळख कॅरेबियन संघाला करून दिली. या सामन्यातील खेळीसह सूर्याने शतक केलं आहे. हे शतक म्हणजे सूर्या सर्वात कमी बॉलमध्ये 100 सिक्स मारणारा सूर्या पहिला भारतीय तर जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.
सूर्यकुमार याने एविन लुईस याने अवघ्या 789 बॉलमध्ये 100 सिक्स मारले आहेत. त्यानंतर 963बॉलमध्ये कॉलिन मुनरो, तिसऱ्या स्थानी सूर्यकुमार याने 1007 त्यानंतर युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने 1071 बॉलमध्ये षटकारांचं शतक पूर्ण केलं आहे.
वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.