50,50,50, Smriti Mandhana चा कारनामा, सलग तिसऱ्या अर्धशतकासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Smriti Mandhana World Record : स्मृती मंधाना हीने इतिहास रचला आहे. स्मृतीने विंडीज विरुद्ध सलग तिसरं अर्धशतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
भारतीय महिला संघाची अनुभवी फलंदाज सांगलीकर स्मृती मंधाना हीने इतिहास रचला आहे. स्मृती मंधाना हीने विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. स्मृतीचं हे या मालिकेतील सलग तिसरं अर्धशतक ठरलं आहे. स्मृतीने यासह अर्धशतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. स्मृती मिताली राजनंतर सलग 3 अर्धशतकं करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तसेच स्मृतीने यासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे. स्मृती टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणारी पहिला महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
स्मृतीने विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकलं. स्मृतीच्या कारकीर्दीतील हे 29 वं अर्धशतकं ठरलं. स्मृतीने यासह न्यूझीलंडची ऑलराउंडर सुझी बेट्स हीच्या सर्वाधिक टी 20i अर्धशतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर आता डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. स्मृतीने तिच्या टी 20i कारीकीर्दीतील 30 वं अर्धशतक हे अवघ्या 27 चेंडूंमध्ये पूर्ण केलं. स्मृतीने 9 चौकार आणि 1 षटकारांसह ही कामगिरी केली.
सुझी बेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त
स्मृतीने सुझी बेट्सच्या तुलनेत 28 डावाआंधी 30 वं अर्धशतक पूर्ण केलं. सुझीला 30 व्या अर्धशतकासाठी 168 डावांचा सामना करावा लागला. तर स्मृतीने अवघ्या 142 डावांमध्ये ही कामगिरी करुन दाखवली.
दरम्यान स्मृतीला या सामन्यात शतक करण्याची संधी होती. मात्र स्मृती 77 धावांवर आऊट झाली. स्मृतीने 47 बॉलमध्ये 163.83 च्या स्ट्राईक रेटने 13 चौकार आणि 1 षटकारासह 77 धावा केल्या.
स्मृतीच्या विंडीज विरूद्धच्या टी 20i सामन्यांमधील धावा
- पहिली मॅच, 33 बॉल 54 रन्स.
- दुसरा सामना, 41 चेंडू 62 धावा.
- तिसरा सामना, 47 बॉल 77 रन्स.
स्मृतीचा विश्वविक्रम
5⃣0⃣ in the 1st T20I ✅ 5⃣0⃣ in the 2nd T20I ✅ 5⃣0⃣ in the 3rd T20I ✅
Smriti Mandhana’s fine run of form continues! 🙌 🙌
Live ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/rSKvqupmVS
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), उमा चेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, रघवी बिस्ट, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), सजीवन सजना, राधा यादव, सायमा ठाकोर, तितास साधू आणि रेणुका ठाकूर सिंग.
वूमन्स वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, नेरिसा क्राफ्टन, शबिका गजनाबी, आलिया ॲलेने, झैदा जेम्स, एफे फ्लेचर आणि करिश्मा रामहारक.