IND vs WI : पहिल्या वनडे सामन्यात सातव्या क्रमांकावर का उतरला? रोहित शर्मा याने सांगितलं कारण

IND vs WI : भारताने पहिला वनडे सामना पाच गडी राखून आपल्या खिशात घातला. पण या सामन्यातील बॅटिंग ऑर्डरमुळे सर्वच चक्रावून गेले. कर्णधार आणि ओपनर रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर उतरला होता.

IND vs WI : पहिल्या वनडे सामन्यात सातव्या क्रमांकावर का उतरला? रोहित शर्मा याने सांगितलं कारण
IND vs WI : सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचं कारण काय? रोहित शर्मा स्पष्टच म्हणाला की...
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 6:42 PM

मुंबई : कर्णधार रोहित शर्मा भारताचा ओपनिंग बॅट्समन आहे. संघासाठी त्याने अनेकदा चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकंच काय तर विराट कोहलीही फलंदाजीसाठी उतरला नाही. उलट सुलट बॅटिंग ऑर्डर पाहून क्रीडाप्रेमीही चक्रावून गेले. विजयासाठी 50 षटकात फक्त 50 धावांचं आव्हान असताना रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर का उतरला? असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत आता रोहित शर्मा यानेच खुलासा केला आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

“मी कधीच विचार केला नव्हता की खेळपट्टी अशी असेल. त्यामुळे मी विचार केला की पहिल्यांदा गोलंदाजी करून दिलेल्या धावांचं आव्हान गाठायचं. खेळपट्टी सीमर्स आणि फिरकीसाठी चांगली होती. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मी जेव्हा भारतासाठी पहिल्यांदा खेळलो तेव्हा सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. मला त्या दिवसाची आठवण आली.”, असं रोहित शर्मा याने सांगितलं.

“वनडेमध्ये खेळण्यासाठी मी खेळाडूंना वेळ देऊ इच्छित होतो. जे संघात आहेत त्यांचं परीक्षण करत आहोत. त्यांना 115 धावांवर रोखू असं आम्हाला माहिती होतं. त्यामुळे काही जणांना संधी देऊन परीक्षण करता येऊ शकतं. मला वाटत नाही त्यांना या पद्धतीने संधी मिळेल. मुकेशने चांगली गोलंदाजी केली. तो चांगला स्विंग करतो. ईशानने चांगली फलंदाजी केली.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

115 धावांचं आव्हान गाठताना गमावले 5 विकेट

वेस्ट इंडिजने विजयासाठी 115 धावांचं आव्हान दिलं असताना ते गाठणं भारताला सहज सोपं झालं नाही. पाच गडी गमवून भारताने हे आव्हान गाठलं. ओपनिंगला आलेल्या ईशान किशन याने 46 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. शुभमन गिल काही खास करू शकला नाही. आतापर्यंतच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात हव्या तशा धावा त्याला करता आल्या नाहीत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), कायले मेयर्स, ब्रँडन किंग, अॅलिक अथानाझे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स आणि गुडाकेश मोती.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.