WI vs IND T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, वेस्ट इंडिजचा ‘तो’ घातक प्लेअर परतला

INDIA vs WEST INDIES : पहिल्या टी-20 सामन्याआधी टीम इंडियाला अलर्ट रहावं लागणार आहे. कॅरेबियन संघांमध्ये धोकादायक प्लेअरची एन्ट्री झालीये. या खेळाडूसाठी कर्णधार हार्दिक पंड्याच्या यंगिस्तान संघाला मास्टरप्लॅन करावा लागणार आहे.

WI vs IND T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, वेस्ट इंडिजचा 'तो' घातक प्लेअर परतला
Rohit Sharma-Hardik pandya
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 11:19 AM

मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील कसोटी आणि वन डे मालिकेनंतक आता टी-20  मालिका सुरू होणार आहे. दोन्ही मालिका टीम इंडियाने जिंकल्या असून आता पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरूवात होईल. पहिला सामना आज म्हणजेच गुरूवारी संध्याकाळी पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला अलर्ट रहावं लागणार आहे. कॅरेबियन संघांमध्ये धोकादायक प्लेअरची एन्ट्री झालीये. या खेळाडूसाठी  कर्णधार हार्दिक पंड्याच्या यंगिस्तान संघाला मास्टरप्लॅन करावा लागणार आहे.

कोण आहे तो खेळाडू? 

वेस्ट इंडिज संघाने टी-20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला होता. यामध्ये रोव्हमन पॉवेल याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संघामध्य वन डे संघाचा कर्णधार शाई होप याचीची निवड करण्याती आलीये. गेल्या वर्षेभरापासून शाई होपने एकही टी-20 सामना खेळलेला नाही. पण आता झालेल्या वन डे सामन्यांमध्ये त्याने दमदार फलंदाजी केली होती. कोलकातामध्ये 2022 साली टीम इंडियाविरूद्ध शेवटचा सामना खेळला होता. तर दुसरीकडे वेगवान आणि आक्रमक गोलंदाज ओशेन थॉमसलाही संघात स्थान मिळालं असून टीम इंडियासाठी हो गोलंदाज धोका ठरू शकतो.

रोव्हमन पॉवेल कर्णधार तर काईल मायर्स, निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायर यांच्यावर बॅटींगची जबाबदारी असणार आहे. आताच झालेल्या मेजर क्रिकेट लीगमध्ये निकोलस पूरन याने लीगच्या फायनल सामन्यामध्ये अवघ्या 55 चेंडूत 137 धावांची धमाकेदार खेळी करत संंघाला विजेतेपद जिंकवून दिलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात पूरन टीम इंडियासाठी धोक्याची घंटा असू शकते.

दरम्यान, येत्या वर्षी म्हणजेच 2024 ला टीम इंडियामध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर विंडिजचा संघ तयारी करत आहे. मात्र यंदाच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये कॅरिबियन संघ पात्रता फेरीमध्ये विजय मिळवू शकला नाही याचा फटका म्हणजे यंदाच्या वर्ल्ड कपसाठी ते पात्र ठरले नाहीत.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.