IND vs WI 4th T-20 : टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान, सांघिक कामगिरीची गरज
IND vs WI 4th T-20 : . तीन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर टीमने विजय मिळवला होता. आता चौथ्या सामन्यामध्ये टीम इंडियाला विजय मिळवणं महत्त्वाचं आहे.
मुंबई : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील चौथा टी-20 सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये भारतासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान असणार आहे. तीन सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात सांघिक कामगिरीच्या जोरावर टीमने विजय मिळवला. यामध्ये सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर हा सामना टीम इंडियाने जिंकला. सूर्यकुमारने 44 चेंडूत 83 धावा तर तिलक वर्मा याने नाबाद 49 धावा केल्या होत्या. आता संघासमोर चौथा सामना जिंकणं हे मोठं आव्हान असणार आहे.
चौथ्या सामन्यामध्ये संघात बदल झालेले पाहायला मिळू शकतात. कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू ईशान किशन याल प्लेइंग ११ मध्ये संंधी मिळण्याची शक्यता आहे. कारण सलामीवीर शुबमन गिल याला सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये यशस्वी अशी कामगिरी करता आली नाही. तर दुसरीडे ईशान किशन याने तिन्ही वन डे सामन्यांमध्ये अर्धशतक करत संंघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. मात्र गिल याला एकाही सामन्यामध्ये मोठी खेळी करता आली नाही.