Team India : टीम इंडियाचा कॅप्टन अखेर बदललाच, एका मुंबईकरच्या एन्ट्रीनंतर दुसरा मुंबईकर OUT
हिटमॅन रोहित शर्मा असून त्याला संघातून वगळण्यात आलं आहे. अजित आगरकर हा मुंबईकर खेळाडू असून रोहित शर्मा बाहेर गेल्याने सोशल मीडियावर नेटकरी मीम्स व्हायरल करत आहेत. पाहा आता नवीन खेळाडू कोण आहे ज्याच्याकडे कर्णधारपद दिलं आहे.
मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. निवड समितीच्या अध्यक्षपदा अजित आगरकर यांची निवड करण्यात आली आहे. आगरकर यांनी निवडलेल्या पहिल्या टीममध्ये मुंबईकर खेळाडू बाहेर झाला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीतर हिटमॅन रोहित शर्मा असून त्याला संघातून वगळण्यात आलं आहे. अजित आगरकर हा मुंबईकर खेळाडू असून रोहित शर्मा बाहेर गेल्याने सोशल मीडियावर नेटकरी मीम्स व्हायरल करत आहेत.
कोण आहे नवीन कर्णधार?
रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्या कर्णधारपदाबाबत सर्वांना चिंता वाटत आहे. बीसीसीआयने एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा याच्याकडेच संघाचं कर्णधारपद ठेवलं आहे. मात्र टी-20 मालिकेमध्ये स्टार आणि ऑल राऊंडर खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
बीसीसीआयने टी-20 मालिकेमध्ये रोहित शर्मा याच्या ऐवजी हार्दिक पंड्याकडे कॅप्टन्सी सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मासह काही मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र अजित आगरकर यांची निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे एक मुंबईकर इन तर दुसरा मुंबईकर आऊट झाल्याचं नेटकरी बोलत आहेत.
बीसीसीआयने टी-20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संधी दिली आहे. या संघामध्ये संजू सॅमसन आणि रवी बिश्नोई यांचं कमबॅक झालं असून यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा यांची निवड झाली असून त्यांचा पहिल्यांदाच संघामध्ये समावेश झाला आहे.
टीम इंडिया टी-20 संघ : इशान किशन (W), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.