नवी दिल्ली : ओबेद मॅकॉयच्या (Obed McCoy) नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजच्या (India) गोलंदाजांनी दुसऱ्या टी-20 सामन्यात चमकदार कामगिरी केली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडिया (IND vs WI) 19.4 षटकात 138 धावांवर गडगडली. यानंतर विंडीज संघानं 19.2 षटकात 5 बाद 141 धावा केल्या आणि सामना 5 विकेटनं जिंकला. अशाप्रकारे विंडीज संघानं 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मालिकेतील तिसरा सामना या मैदानावर आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. 25 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने 4 षटकात फक्त 17 धावा दिल्या आणि 6 बळी घेतले. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताविरुद्ध पहिल्यांदाच गोलंदाजाने 6 विकेट घेतल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 31 धावा केल्या. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 68 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्याने 190 धावा केल्या. मात्र या सामन्यात त्यांचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले.
Early tumble of wickets for India, a product of their aggression against the new ball. Can they rebuild?
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, only on #FanCode ? https://t.co/RCdQk12YsM@BCCI @windiescricket #WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/zPNAo0P91d
हे सुद्धा वाचा— FanCode (@FanCode) August 1, 2022
भारताविरुद्ध पहिल्यांदाच गोलंदाजाने 6 विकेट घेतल्या. भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक 31 धावा केल्या. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 68 धावांनी विजय मिळवला होता.
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉयने प्राणघातक गोलंदाजी केल्यानं भारताचा पराभव झाला. त्यानं भारताचा निम्मा संघ 17 धावांत गुंडाळला. 6 विकेट्ससह, McCoy T20I मध्ये वेस्ट इंडिजचा सर्वोत्तम फिगर गोलंदाज बनला. दुसरीकडे, भारताविरुद्ध, कोणत्याही फॉरमॅटमध्ये कोणत्याही कॅरेबियन गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
मालिकेतील तिसरा सामना या मैदानावर आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी होणार आहे. आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असेल.