IND vs WI ODI : सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू जखमी, केएल राहुलनंतर पुन्हा गळती, संघाची डेकेदुखी वाढली

जडेजाला वनडे मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलंय. पण, तो जखमी झाला. यामुळे तो सरावातही सहभागी झाला नाही. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

IND vs WI ODI : सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, स्टार खेळाडू जखमी, केएल राहुलनंतर पुन्हा गळती, संघाची डेकेदुखी वाढली
स्टार खेळाडू जखमीImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 9:15 AM

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI ODI) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि ऋषभ पंत या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ या मालिकेत प्रवेश करेल. संघाची कमानही शिखर धवनच्या हाती असेल. अशा परिस्थितीत युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असेल. मात्र, पहिल्या वनडेआधीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) जखमी झाला आहे. जडेजाला वनडे मालिकेसाठी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पण, तो जखमी झाला आहे. यामुळे तो संघाच्या इनडोअर सराव सत्रातही सहभागी झाला नाही. जडेजाची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकलेले नाही, पण ज्या पद्धतीने तो सराव सत्रात सहभागी झाला नाही. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता कमी दिसत आहे.

संघाच्या शिखर धवननेही या दिशेनं लक्ष वेधलं आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत धवनने जडेजाच्या दुखापतीबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्रच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे आणि त्याची दुखापत किती खोल आहे, बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याचे मूल्यांकन करत आहे.

जडेजा एकदिवसीय मालिकेतून बाहेर?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, टी-20 विश्वचषक पाहता बीसीसीआयला धोका पत्करायचा नाही, त्यामुळे जडेजाला संपूर्ण वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. जेणेकरून त्याच्या डाव्या गुडघ्याची दुखापत आणखी वाढू नये. संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी जडेजाला विश्रांती दिल्यास तो 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

उपकर्णधार कोण होणार?

जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनासमोरही पेच निर्माण झाला आहे. त्याला वनडे मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जडेजा एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला तर त्याच्या जागी नवीन उपकर्णधाराची निवड करावी लागेल. मात्र, बीसीसीआय हा निर्णय प्रशिक्षक राहुल द्रविडवर सोडू शकते. संघात युझवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूरसारखे वरिष्ठ खेळाडू आहेत.

दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खुलासा केला आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन पूर्ण करत असलेल्या केएल राहुलची चाचणी सकारात्मक आली आहे आणि तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच T20 मालिकेत भाग घेण्याची शक्यता नाही. केएल राहुलवर नुकतीच जर्मनीत हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. फिटनेस मिळविण्यासाठी तो सध्या एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.