Team India : भावा मानलं रे! टीम इंडियाबाबत रविंद्र जडेजाची ‘ती’ भविष्यवाणी ठरली खरी
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. मात्र टी-20 संघाची घोषणा करण्यात आलेली नव्हती. अखेर बुधवारी बीसीसीआयने घोषणा केल्यावर स्टार खेळाडू रविंद्र जडेजा याची भविष्यवाणी खरी ठरली आहे.
मुंबई : बीसीसीयने वेस्ट इंडिज दौऱ्याच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. जाहीर झालेल्या संघामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. मात्र टी-20 संघाची घोषणा करण्यात आलेली नव्हती. अखेर बुधवारी बीसीसीआयने घोषणा केल्यावर स्टार खेळाडू रविंद्र जडेजा याची भविष्यवाणी खरी ठरली आहे.
रविंद्र जडेजाने कोणती भविष्यवाणी केलेली?
टीम इंडियामध्ये निवड झालेल्या दोन खेळाडूंपैकी एका खेळाडूबाबत आधीच भविष्यवाणी केली होती. दोन युवा खेळाडू त्यातील एक यशस्वी जयस्वाल आणि दुसरा तिलक वर्मा आहे. रविंद्र जडेजाने याआधीच यामधील एका खेळाडूच्या निवडीबाबत सूचक वक्तव्य केलं होतं.
नेमका कोण तो खेळाडू?
रविंद्र जडेजाने भविष्यवाणी केलेला खेळाडू तिलक वर्मा आहे. तिलक वर्मा याच्यासोबत जडेजाने फोटो पोस्ट केला होता, टीम इंडियाच्या भविष्यासोबत चिल करताना, असं कॅप्शन ठेवत त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.
तिलक वर्माने डिसेंबर 2018 मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याने आतापर्यंत एकूण 7 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत आणि 40.90 च्या सरासरीने 409 धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेशा आहे. त्यासोबतच 25 लिस्ट ए सामन्यांमध्ये 56.18 च्या सरासरीने 1236 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत.
विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज वेळापत्रक पहिला सामना, 3 ऑगस्ट.
दुसरा सामना, 6 ऑगस्ट.
तिसरा सामना, 8 ऑगस्ट.
चौथा सामना, 12 ऑगस्ट.
पाचवा सामना – 13 ऑगस्ट.
टीम इंडिया टी-20 संघ : इशान किशन (W), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्य कुमार यादव (VC), संजू सॅमसन (W), हार्दिक पांड्या (C), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.