IND vs WI : चौथ्या टी20 सामन्यात विजय मिळवूनही कर्णधार हार्दिक पांड्या निराश, म्हणाला…

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत आली आहे. त्यामुळे पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. चौथ्या सामन्यात कमबॅक करूनही कर्णधार हार्दिक पांड्या हा निराश असल्याचं दिसून आला.

IND vs WI : चौथ्या टी20 सामन्यात विजय मिळवूनही कर्णधार हार्दिक पांड्या निराश, म्हणाला...
IND vs WI : चौथा टी20 सामना जिंकत मालिकेत बरोबरी, पण तरीही हार्दिक पांड्याने व्यक्त केलं असं दु:ख
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 3:05 PM

मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने जबरदस्त कमबॅक केलं आहे. पहिले दोन सामने गमवल्यानंतर टीम इंडियासमोर मालिकेतील आव्हान राखण्याचं दडपण होतं. पण टीम इंडियाच्या खेळाडूंना तिसरा आणि चौथा टी20 सामना जिंकत कमबॅक केलं आणि मालिकेत 2-2 बरोबरी साधली आहे. चौथा टी20 सामना भारताने 9 गडी राखून जिंकला. या विजयात यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मोठ्या विजयानंतरही भारतीय कर्णधार हार्दिक पांड्या निराश असल्याचं दिसून आला. विजयानंतर हार्दिक पांड्या याने आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यातून संघाच्या कामगिरीवर खूश नसल्याचं दिसून आलं.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

हार्दिक पांड्या चौथ्या सामन्यातील विजयानंतर म्हणाला की, “पुढे जाऊन फलंदाजांना अजून जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि गोलंदाजांना सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे. माझं कायम असं म्हणणं आहे की गोलंदाज सामना जिंकवतात. यशस्वी आणि शुभमन आज चांगले खेळले. त्यांची फलंदाजी पाहून बरं वाटलं. त्यांच्या कौशल्यावर कोणताही संशय नाही. फक्त त्यांना खेळपट्टीवर तग धरून खेळणं महत्त्वाचं आहे.”, असं हार्दिक पांड्या याने सांगितलं.

काय म्हणाला यशस्वी जयस्वाल?

चौथ्या टी20 सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबाबत यशस्वी जयस्वाल याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी त्याने कर्णधार आणि इतर खेळाडूंचे आभार मानले. यशस्वी जयस्वाल याने सांगितलं की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोपं नाही. पण मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे. हार्दिक भाई आणि इतर खेळाडूंनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यामुळे मी खूश आहे.”

आता पाचवा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. आज फ्लोरिडाच्या सेंट्रल ब्रोवार्ड रीजनल पार्क स्टेडियमध्ये सामना होणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास 3-2 ने मालिका खिशात घालेल. या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळलेले खेळाडूचे पुन्हा मैदानात उतरतील. गोलंदाजीत मुकेश ऐवजी उमरान मलिकला संधी मिळू शकते.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारताची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.

वेस्ट इंडिजची प्लेइंग इलेव्हन : ब्रँडन किंग, कायल मेयर्स, शाय होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमॅन पॉवेल (कर्णधार), शिम्रॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अल्जारी जोसेफ, अकील हुसैन, ओबेड मॅकॉय.

'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.