Ind Vs WI, Shai Hope : क्या बात है शाई होप, 100व्या एकदिवसीय सामन्यात शतक, शिखर धवन-डेव्हिड वॉर्नरच्या क्लबमध्ये होप, अधिक जाणून घ्या…
शाई होप हा 100व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा वेस्ट इंडिजचा चौथा फलंदाज आहे. 16 वर्षांनंतर विंडीजसाठी कोणत्याही खेळाडूनं अशी कामगिरी केलेली नाही. रामनरेश सरवननं 2006 मध्ये कामगिरी केली होती.
नवी दिल्ली : क्रिकेट म्हटलं की विक्रम होणारच. कालही असाच एक विक्रम झाला. रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या (Ind Vs WI) 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतानं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा प्रकारे भारतानं मालिकेवरही कब्जा केला आहे. भारतीय संघानं (Indian cricket team) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 चेंडू राखून 2 गडी राखून पराभव केला. याच सामन्यात शाई होपनं (Shai Hope) रविवारी त्रिनिदाद येथे भारताविरुद्ध 100 वा एकदिवसीय सामना खेळला. होपनं आपल्या 100व्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावलं आहे. हे त्याचं एकदिवसीय कारकिर्दीतील 13 वे शतक आहे. याशिवाय भारताविरुद्ध तिसऱ्यांदा 100 हून अधिक धावा केल्या आहेत. 100व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा होप जगातील 10वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुणी असे विक्रम केले आहेत. त्याविषयी अधिक जाणून घ्या…
आयसीसीचं ट्विट
A hundred in his 100th ODI! ?
हे सुद्धा वाचाShai Hope completes his 13th ODI hundred in Port of Spain in the second ODI ?
Watch #WIvIND for FREE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) ? | https://t.co/tCiz5Jjaqf pic.twitter.com/MPRC9vQl4U
— ICC (@ICC) July 24, 2022
तो ठरला चौथा फलंदाज
शाई होप हा 100व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा वेस्ट इंडिजचा चौथा फलंदाज आहे. 16 वर्षांनंतर विंडीजसाठी कोणत्याही खेळाडूनं अशी कामगिरी केलेली नाही. रामनरेश सरवन यांनी शेवटच्या वेळी 2006 मध्ये ही कामगिरी केली होती. सरवनच्या आधी स्फोटक फलंदाज क्रिस गेलनं 2004 मध्ये 100व्या एकदिवसीय सामन्यात आणि 1988 मध्ये गॉर्डन ग्रीनिजने शतक झळकावलं होतं. अशी कामगिरी करणारा ग्रीनिज हा जगातील पहिला फलंदाज होता.
भारताविरुद्ध चौथ्यांदा…
शतक झळकावून होप डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला. धवन आणि वॉर्नरने 100व्या वनडेतही शतके झळकावली आहेत. होपच्या आधी धवननेच हे केले होते. भारताकडून चार वेळा एका खेळाडूने शंभराव्या वनडेत शतक झळकावलं.
आयसीसीचं ट्विट
Axar Patel’s the hero in Trinidad!
The all-rounder’s 64* (35) lifts India to a final-over win over the West Indies, and moves the tourists to an unassailable 2-0 ODI series lead.#WIvIND pic.twitter.com/fSSZ41BkW8
— ICC (@ICC) July 24, 2022
सामन्यात काय झालं?
वेस्ट इंडिजनं 50 षटकांत 311 धावा केल्या. त्यांनी भारतासमोर विजयासाठी 312 धावांचे लक्ष्य ठेवले होते. विंडीजकडून शाई होपनं 115 धावा केल्या. त्यानं त्याच्या 100 व्या वनडेमध्ये शतक झळकावलं. अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडिजचा चौथा आणि जगातील 10वा फलंदाज आहे. होपने 135 चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याच्याशिवाय कर्णधार निकोलस पूरनने 74 धावांची खेळी खेळली. काइल मेयर्सने 39 आणि शामराह ब्रूक्सने 35 धावा केल्या. रोमारियो शेफर्ड १५ धावांवर नाबाद राहिला तर अकील हुसेनने सहा धावा केल्या.
रोव्हमन पॉवेलने 13 धावांचे योगदान दिले. ब्रँडन किंग खाते उघडू शकला नाही. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन बळी घेतले. दीपक हुडा, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक यश मिळाले.