IND vs WI: दुखापतग्रस्त वॉशिंगटन सुंदर संघाबाहेर, दिग्गज फिरकीपटूचं 6 महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) दुखापतग्रस्त होऊन संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे.

IND vs WI: दुखापतग्रस्त वॉशिंगटन सुंदर संघाबाहेर, दिग्गज फिरकीपटूचं 6 महिन्यांनी टीम इंडियात कमबॅक
Washington Sundar - Rohit Sharma
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 10:26 AM

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियासाठी (Team India) वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sunder) दुखापतग्रस्त होऊन संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. एका वृत्तानुसार, सुंदरला मालिकेपूर्वी दुखापत झाली असून यापुढे तो या मालिकेचा भाग नसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदर कोलकाता येथे उपस्थित असलेल्या भारतीय संघापासून वेगळा झाला आहे आणि आता तो थेट राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जाईल, जिथे त्याच्या दुखापतीची काळजी घेत उपचार केले जातील. सुंदरने नुकतेच एकदिवसीय मालिकेतूनच संघात पुनरागमन केले होते. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुंदरच्या जागी अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) संघात संमावेश केला आहे. कुलदीपने नुकतेच एकदिवसीय मालिकेद्वारे टीम इंडियात कमबॅक केलं होतं. आता त्याने टी-20 संगातही पुनरागमन केलं आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुंदरला हॅमस्ट्रिंगची समस्या आहे, त्यामुळे तो या मालिकेत खेळण्याची शक्यता नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, “वॉशिंग्टनला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो आज सराव करू शकला नाही. 5 दिवसांत 3 सामने खेळवले जाणार असल्याने तो संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

जुलैनंतर कुलदीप टी-20 संघात परतला

यासोबतच सुंदरच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादवचा संघात समावेश करण्याची घोषणाही बोर्डाने केली. कुलदीपनेही दुखापतीनंतर वनडे मालिकेतून संघात पुनरागमन केले होते. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सुंदरला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. जुलै 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यावर कुलदीपने भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्या मालिकेत कुलदीपने दोन सामन्यांत 3 बळी घेतले होते. कुलदीपच्या नावावर 23 सामन्यांत 41 बळी आहेत. दोन दिवसांपूर्वी, कुलदीपला आयपीएल 2022 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते.

मागील वर्षही सुंदरचे दुखापतीत गेलं

सुंदरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतूनच टीम इंडियात पुनरागमन केले होते. गतवर्षी इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाल्याने तो कसोटी मालिकेत खेळला नव्हता. यानंतर तो आयपीएल 2021 आणि टी-20 वर्ल्ड कपही खेळू शकला नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी सुंदरची निवड करण्यात आली होती, परंतु रवाना होण्यापूर्वी त्याला कोरोना संसर्ग झाला आणि त्यामुळे तो बाहेर झाला. टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाकडे आता फक्त लेग-स्पिनर युजवेंद्र चहल हा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. संघात रवी बिश्नोईचाही समावेश असला तरी हरप्रीत ब्रारही स्टँडबाय म्हणून संघासोबत कोलकाता येथे पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सुंदरच्या जागी याचा संघात समावेश होतो की नाही हे पाहावे लागेल.

तिसरा खेळाडू मालिकेतून बाहेर

सुंदर आता थेट बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाईल, जिथे तो त्याच्या दुखापतीवर उपचार करेल. भारताचा धाकड खेळाडू आणि अक्षर पटेल याआधीच सिरीजमधून बाहेर गेले आहेत. राहुल आणि अक्षर देखील टी-20 मालिकेचा भाग होते, परंतु दोघांनाही वेगवेगळ्या कारणांमुळे वगळण्यात आले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान राहुलला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो तिसऱ्या वनडेत खेळू शकला नाही. त्याचवेळी, अक्षर पटेलला वनडे मालिकेपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.

T20I मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा आणि कुलदीप यादव

इतर बातम्या

IPL 2022 : IPL मध्ये त्याला कोणी विचारलं नाही, अखेर ‘त्या’ सौंदर्यवतीने समोर येऊन दिलं उत्तर, कोण आहे ‘ती’

IND vs WI: टीम इंडियाला तिसरा मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर T20 मालिकेतून बाहेर

IPL 2022: ‘एलआयसी’चं आयपीएल कनेक्शन: कोणत्या संघात कुणाचा किती वाटा?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.