IND vs WI T20 : वेस्ट इंडिजचं टीम इंडियासमोर 150 धावांचं आव्हान, भारताच्या खेळीकडे लक्ष

IND vs WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पहिला टी20 सामना सुरु आहे. वेस्ट इंडिजने पहिल्यांदा फलंदाजी करताना 150 धावांचं आव्हान ठेवलं आहे.

IND vs WI T20 : वेस्ट इंडिजचं टीम इंडियासमोर 150 धावांचं आव्हान, भारताच्या खेळीकडे लक्ष
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 9:55 PM

मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 षटकात वेस्ट इंडिजने 6 गडी गमवून 149 धावा केल्या आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय संघ हे आव्हान कशा पद्धतीने पार पाडतो, याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. वेस्ट इंडिजकडून निकोलस पुरन आणि रोवमन पॉवेल यांनी चांगली खेळी केली.

वेस्ट इंडिजचा डाव

वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग आणि कायल मायर्स ही जोडी सलामीला आली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 29 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात यजुवेंद्र चहल याला यश आलं. कायल मायर्स याला पायचीत करत त्याने तंबूचा रस्ता दाखवला. तो तंबूत परतत नाही तोच ब्रँडन किंग याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्याने 19 चेंडूत 28 धावा केल्या. या खेळीत 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

जॉन्सन चार्ल्स काही खास करू शकला नाही. अवघ्या तीन धावा करून बाद झाला. दुसरीकडे निकोलस पूरनने चांगली खेळी केली. त्याने 34 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने 41 धावा केल्या. हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेल बाद झाला. तिलक वर्माने त्याचा झेल घेतला.

पूरन बाद झाल्यानंतर रोवमन पॉवेल याने मोर्चा सांभाळला. त्याने 32 चेंडूत 3 षटकार, 3 चौकाराच्या मदतीने 48 धावा केल्या. अर्शदीपच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने त्याचा झेल घेतला. शिम्रॉन हेटमायरही काही खास करू शकला नाही. अवघ्या 10 धावा करून बाद झाला.

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडीज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.