IND vs WI: हार्दिक पांड्याकडून पहिल्याच टी20 मध्ये मोठी चूक, युजवेंद्र चहल याला मैदानातून परत बोलवलं पण… Watch Video
IND vs WI: पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना भारतान 4 धावांनी गमावला. या सामन्यातील शेवटच्या क्षणी कर्णधार हार्दिक पांड्या याच्याकडून मोठी चूक घडली.
मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी20 सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. पण टीम इंडियाला विजयश्री खेचून आणण्यात अपयश आलं. वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 गडी गमवून 149 धावा केल्या आणि विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिलं. भारताला हे आव्हान काही गाठता आलं आहे. भारताने 20 षटकात 9 गडी गमवून 145 धावा केल्या आणि 4 धावांनी पराभव सहन करावा लागला. या सामन्यात एकच वेगळंच चित्र पाहायला मिळाला. अगदी मोक्याच्या क्षणी कर्णधार हार्दिक पांड्या याच्याकडून मोठी चूक झाली. पण चूक सुधारण्यापर्यंत वेळ निघून गेली होती आणि पंचांनी आपला इंगा दाखवला आणि युजवेंद्र चहल याला पुन्हा बोलवून घेतलं.
नेमकं काय घडलं मैदानात?
भारताला शेवटच्या षटकात 10 धावांची आवश्यकता होती. पण पहिल्या चेंडूवरच कुलदीप यादव याची विकेट गेली. रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडला. आठवा गडी बाद झाल्यानंतर मुकेश कुमार आणि युजवेंद्र चहल पॅव्हेलियनमध्ये बसले होते. अखेर युजवेंद्र चहल बॅट घेऊन मैदानात उतरला. पण प्रशिक्षक राहुल द्रविड आणि हार्दिक पांड्याच्या निर्णयाने गोंधळून पुन्हा तंबूत परतू लागला. त्यांना चहल ऐवजी मुकेश कुमार याला मैदानात पाठवायचं होतं.
युजवेंद्र चहल ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि मैदानात मुकेश कुमार याने एन्ट्री मारली. नेमकी ही बाब पंचांच्या लक्षात आली आणि त्यांनी युजवेंद्र चहल याला मैदानात पु्न्हा बोलवलं. कारण आयसीसी नियमानुसार एकदा का फलंदाजाने मैदानात एन्ट्री मारली की, पुन्हा पॅव्हेलियनमध्ये परतू शकत नाही.त्यामुळे युजवेंद्र चहल याला फलंदाजीसाठी उतरणं भाग पडलं.
Yuzvendra Chahal walked out at No.10, but the Indian team wanted Mukesh Kumar. Chahal walked off and entered again as he took the field already#Yuzvendrachahal??#INDvWI pic.twitter.com/8rWxh30ahh
— Md Nayab 786 ?? (@mdNayabsk45) August 3, 2023
युजवेंद्र चहल याने रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर एक धाव घेऊन अर्शदीप सिंह याला स्ट्राईक दिली. अर्शदीपने पुढच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि चौथा चेंडू डॉट राहिला. पाचव्या चेंडूवर अर्शदीप रनआऊट झाला. विजयासाठी एक चेंडूत सहा धावांची आवश्यकता होती. तेव्हा मैदानात आलेल्या मुकेश कुमारने एक धाव घेतली आणि सामना 4 धावांनी गमावला.
..तर रिटायर आऊट व्हावं लागलं असतं
युजवेंद्र चहल मैदानात आला होता. त्यामुळे त्याच्या खेळीला सुरुवात झाली होती. अशा स्थितीत त्याला पुन्हा बोलवलं जाऊ शकत नाही. पण रिटायर आऊट करून पुन्हा बोलवलं जाऊ शतं. पण या नंतर चहल पुन्हा फलंदाजीसाठी उतरू शकला नसता. संघाचे 8 गडी बाद झाले होते त्यामुळे टीम मॅनेजमेंटने चहलला पुन्हा फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.