IND vs WI : पदार्पणाच्या टी 20 सामन्यात तिलक वर्माने घेतला जबरदस्त झेल, पाहा Video
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली आहे. या सामन्यातून तिलक वर्मा आणि मुकेश कुमार पदार्पण करत आहेत.
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात मालिकेतील पहिला टी20 सामना ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ब्रँडन किंग आणि कायल मायर्स यांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. खरं तर एका बाजूने ब्रँडन किंग हा किल्ला लढवत होता. तर कायल मायर्स नॉन स्ट्राईकर्स एन्डला नुसता उभा होत असंच म्हणावं लागेल. हार्दिक पांड्या दोन्ही खेळाडू मैदानात तग धरल्याचं पाहून युजवेंद्र चहल याच्याकडे चेंडू सोपवला. मग काय पहिल्या चेंडूवरच कायल मायर्स याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर एक चार्ल्सने एक धाव घेत ब्रँडन किंगला स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर ब्रँडन किंगला तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ बॅकफुटला आला. या सामन्यात तिसरी विकेट जॉन्सन चार्ल्सची गेली. या कॅचची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
तिलक वर्मा याने असा घेतला झेल
तिलक वर्मा याचा हा पहिला आंतरराष्ट्रीय टी20 सामना आहे. या सामन्यात त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एकीकडे निकोलस पूरन आक्रमकपणे खेळत असताना एक विकेट महत्त्वाची होती. ती चार्ल्सच्या रुपाने पडली. चार्ल्सने कुलदीप यादवला उत्तुंग फटका मारला. हा चेंडू खूपच वर चढला होता. ही संधी नवख्या तिलक वर्मा याने सोडली नाही. चेंडूवर घारीसारखी नजर ठेवली आणि धाव घेत झेल घेतला. तिलक वर्माने घेतलेल्या झेलची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
What a catch by Tilak Verma on his debut.
A outstanding catch from him – The future of Indian cricket.!! pic.twitter.com/Yred5MUFsC
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 3, 2023
दोन्ही संघाचे खेळाडू
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज प्लेईंग इलेव्हन | रोवमॅन पावेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉनसन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, अकील होसैन, अल्जारी जोसेफ आणि ओबेड मॅकॉय.