Video: तसा प्रश्न विचारताच उपकर्णधार अजिंक्य रहाणे भडकला, कर्णधार रोहित शर्मा यानेही दिली अशी रिॲक्शन
कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरु होणार असून उपकर्णधारपद अजिंक्य रहाणे यांच्याकडे सोपवलं आहे. या सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणे याला एक प्रश्न विचारण्यात आला तो चांगलाच संतापला.
मुंबई : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी 20 सामने खेळणार आहे. 12 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्यात सामन्याला सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी उपकर्णधारपद अजिंक्य रहाणे याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. 18 महिन्यानंतर अजिंक्य रहाणे याने कसोटी संघात पदार्पण केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संधी मिळाली आणि थेट उपकर्णधार म्हणून पद मिळालं आहे. त्याच्याकडे जबाबदारी सोपवल्याने माजी खेळाडूंनी टीकेचे बाण सोडले आहेत. नवोदित खेळाडूला ही जबाबदारी द्यायला हवी होती असा सल्ला माजी खेळाडूंनी दिला आहे. टीम इंडियाच्या निवडीवरून आधीच गोंधळ उडाला आहे. त्यात पत्रकाराने प्रश्न विचारताच सुपर कूल अशी ओळख असलेला अजिंक्य रहाणे संतापला. त्या प्रश्नवर त्याने सडेतोड उत्तर देत आपला राग व्यक्त केला. त्याच्या आक्रमक उत्तराने पत्रकाराचाही बोबडी वळाली. तर तेथे उपस्थित असलेल्या रोहित शर्माला हसू अनावर झालं.
काय म्हणाला अजिंक्य रहाणे
पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणे याच्या वयावर बोट ठेवत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजिंक्य रहाणे याने तडकाफडकी उत्तर दिलं. अजिंक्य रहाणे म्हणाला की, “या वयात म्हणजे काय? मी अजूनही तरुण आहे. मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगल्या धावा केल्या आहेत. फलंदाजीच्या दृष्टीकोनातून माझा आत्मविश्वास दुणावलेला आहे. मागच्या दीड वर्षात मी माझ्या फिटनेसवरही काम केलं आहे. आता मी क्रिकेट खेळत आहे आणि त्याचा आनंद घेणार आहे. त्यामुळे पुढचा विचार मी आता करत नाही.”
?? ??? ????!
When #TeamIndia Captain @ImRo45 turned reporter in Vice-Captain @ajinkyarahane88's press conference ?
What do you make of the questions ? #WIvIND pic.twitter.com/VCEbrLfxrq
— BCCI (@BCCI) July 11, 2023
अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला की, “मी उपकर्णधारपदाची जबाबदारी यापूर्वीही बजावली आहे. जवळपास चार ते पाच वर्षे मी उपकर्णधार होतो. त्यामुळे संघात पुनरागमनासोबत उपकर्णधारपद मिळाल्याने खूश आहे. रोहित शर्मा सर्व खेळाडूंना स्वातंत्र्य देतो आणि त्याच्यात कर्णधारपदाचे सर्व चांगले गुण आहेत.”
अजिंक्य रहाणे वयाबाबत तडकाफडकी दिलेलं उत्तर ऐकून कर्णधार रोहित शर्मा यालाही हसू अनावर झालं. त्यानंतर पत्रकारांसोबत त्यांनीही प्रश्न विचारले. या प्रश्नांना उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने दिलखुलासपणे उत्तरं दिली. प्रश्न उत्तरांचा तास सुरु असताना पावसाने हजेरी लावली आणि मैदानात भरलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांना काढता पाय घ्यावा लागला.
कसोटीसाठी दोन्ही संघांचे खेळाडू
वेस्ट इंडिजचा संघ : जर्मेन ब्लॅकवूड, किर्क मॅककेनझी, क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टगेनरीन चंद्रपॉल, अलिक एथानझे, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, रेमन रेफर, जोशुआ डिसिल्वा, टॅविन इमलाच, अकीम जॉर्डन, एलझारी जोसेफ, जोमेल वॉरिकन, केमर रोच, शॅनन गॅब्राईल.
भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.