IND vs WI : 6 सामने-2 मालिका, भारत-वेस्ट इंडिज सीरिजसाठी संघ जाहीर, पहिला सामना केव्हा?
India vs West Indies : टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिका प्रत्येकी 3-3 सामन्यांच्या होणार आहेत. विंडिज या मालिकांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. वूमन्स टीम इंडिया विरुद्ध वूमन्स वेस्ट इंडिज यांच्यात डिसेंबरमध्ये टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. वूमन्स विंडिज टीम या मालिकांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या मालिकांसाठी बुधवारी 27 नोव्हेंबरला संघ जाहीर केला आहे. विंडिज क्रिकेटने या मालिकांसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. हेली मॅथ्यूज विंडिजच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर शेमाइन कॅम्पबेल हीच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली आहेत. विंडिज क्रिकेटने अधिकृत वेबसाईटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
विंडिजच्या भारत दौऱ्याबाबत थोडक्यात
विंडिज एकूण 13 दिवसीय भारत दौऱ्यात दोन्ही मालिकांमधील एकूण 6 सामने खेळणार आहे. विंडिजच्या भारत दौऱ्याची सुरुवात ही टी 20i मालिकेने होणार आहे. टी 20i सीरिजचं आयोजन हे 15 ते 19 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. तर त्यानंतर एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.
टीम इंडिया-विंडिज टी 20I मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 15 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
दुसरा सामना, 17 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
तिसरा सामना, 19 डिसेंबर, संध्याकाळी 7 वाजता, नवी मुंबई
एकदिवसीय मालिकेचं आयोजन हे 22 ते 27 डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. हे तिन्ही सामनेही टी 20i सीरिज प्रमाणे एकाच स्टेडियमध्ये होणार आहेत. हे सामने बडोद्यात आयोजित करण्यात आले आहेत.
टीम इंडिया-विंडिज एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 22 डिसेंबर, दुपारी दीड वाजता, बडोदा
दुसरा सामना, 24 डिसेंबर, दुपारी दीड वाजता, बडोदा
तिसरा सामना, 27 डिसेंबर, सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी, बडोदा
टी 20i आणि वनडे सीरिजसाठी विंडिज टीम : हेली मॅथ्यूज (कर्णधार), शेमाइन कॅम्पबेल (उपकर्णधार), आलिया एलेने, शमिलिया कोनेल, नेरिसा क्राफ्टन, डिआंड्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, शबिका गजनबी, चिनेल हेन्री, झायदा जेम्स, कियाना मॅन जोसेफ, अश्मिनी मुनिसार, करिश्मा रामहरक आणि रशादा विल्यम्स.