IND vs WI | वेस्ट इंडिजने भारतासमोर ठेवलं 179 धावांचं आव्हान, टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात चौथा टी20 सामना सुरु आहे. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. वेस्ट इंडिजने हा सामना जिंकल्यास मालिका खिशात घालणार आहे.
मुंबई : चौथ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाटा विकेट असल्याने 200 पार धावा होतील असा अंदाज क्रिकेट पंडितांनी बांधला होता. पण वेस्ट इंडिजचा संघ 8 गडी बाद 178 धावा करू शकला. भारतासमोर विजयासाठी 179 धावांचं आव्हान ठेवलं आहे. वेस्ट इंडिजकडून शाय होप्स आणि शिम्रॉन हेटमायर यांनी चांगली फलंदाजी केली. तर फलंदाज एकेरी दुहेरी धावा करून तंबूत परतले. बॅटिंग पिचवर वेस्ट इंडिजची सुरुवात अडखळत झाली. दुसऱ्या षटकातच कायल मायर्स बाद होत तंबूत परतला. त्यामुळे भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी वेस्ट इंडिजला 178 धावांवर रोखलं.
वेस्ट इंडिजचा डाव
वेस्ट इंडिजकडून कायल मायर्स आणि ब्रँडन किंग ही जोडी मैदानात उतरली. पण कायल मायर्स अवघ्या 17 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर ब्रँडन किंगही काही खास करू शकला नाही. त्याने शाय होप्सला साथ दिली मात्र अर्शदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. निकोलस पूरनकडून खूप अपेक्षा होत्या मात्र तोही अवघी 1 धाव करून तंबूत परतला. रोवमॅन पॉवेल आला तसा परत गेला. कुलदीप यादवने त्याला मैदानाबाहेर जाण्याचा रस्ता दाखवला.
शिम्रॉन हेटमायरने मात्र संघाचा डाव सावरला आणि 39 चेंडूत 61 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारता आली. रोमारियो शेफर्ड आणि जेसन होल्डर काही खास करू शकले नाहीत. भारताकडून अर्शदीप सिंगने 3, कुलदीप यादवने 2, तर अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Innings Break!
West Indies post a total of 178/8#TeamIndia chase coming up shortly.
Scorecard – https://t.co/MlhsWMStmd… #WIvIND pic.twitter.com/1hMi08WPNK
— BCCI (@BCCI) August 12, 2023
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
वेस्ट इंडिजचा संघ : कायल मायर्स, ब्रँडन किंग, शाय होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिम्रॉन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, ओडीन स्मिथ, अकील होसैन, ओबेड मॅकॉय
भारताचा संघ : यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार