IND vs WI, WWC 2022 LIVE Streaming: जाणून घ्या कधी, कुठे पाहता येईल सामना?
भारतीय महिला संघ शनिवारी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) तिसरा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडनंतर टीम इंडियाचा सामना आता वेस्ट इंडिज विरुद्ध (IND W vs WI W) होणार आहे.

मुंबई : भारतीय महिला संघ शनिवारी आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Womens World Cup 2022) तिसरा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडनंतर टीम इंडियाचा सामना आता वेस्ट इंडिज विरुद्ध (IND W vs WI W) होणार आहे. भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध मोठा विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्याच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यजमान न्यूझीलंडने (New Zealand) या सामन्यात भारतावर 62 धावांनी मात केली होती. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. भारतीय महिला संघ वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळला आहे. त्यापैकी एक सामना जिंकला आहे तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे.
वर्ल्डकप बद्दल बोलायचे झाल्यास वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाची बाजू वरचढ आहे. कारण या स्पर्धेत आतापर्यंत भारताचा वेस्ट इंडिजकडून कधीच पराभव झालेला नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत सहा सामने झाले आहेत. हे सहा सामने भारताने जिंकले आहेत.
महिला विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघ कधी आमनेसामने येतील?
भारत आणि वेस्ट इंडिजचे संघ 12 मार्चला (शनिवारी) आमनेसामने येणार आहेत.
महिला विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?
महिला विश्वचषक 2022 मधील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना सेडन पार्क, हॅमिल्टन येथे खेळवला जाईल.
महिला विश्वचषक 2022 मधील भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना कधी सुरू होईल?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील महिला विश्वचषक 2022 मधील सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक सकाळी 6 वाजता होणार आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) तुम्ही कुठे पाहू शकता?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.
भारत वि. वेस्ट इंडीज सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन कुठे पाहता येईल?
Disney+Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शनसह सामना ऑनलाइन पाहता येईल. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स वाचता येतील.
इतर बातम्या
IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर
IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत
IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?