IND vs ZIM : दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार गिल म्हणाला…

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत झिम्बाब्वेने भारताचा पहिल्याच सामन्यात धुव्वा उडवला. टीम इंडियात आयपीएल स्टार्सचा भरणा असूनही 13 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. विजयासाठी दिलेलं 115 धावांचं आव्हान संघाला गाठतं आलं नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात कमबॅकसाठी प्रयत्न असेल.

IND vs ZIM : दुसऱ्या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, कर्णधार गिल म्हणाला...
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 4:16 PM

टी20 वर्ल्डकप विजयानंतर खरं तर टीम इंडियाच्या आत्मविश्वास दुणावलेला असायला हवा होता. मात्र पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेने दिलेल्या दणक्यामुळे सर्वच जण भानावर आले आहेत. नवख्या संघाची बांधणी करताना पहिल्याच सामन्यात त्रुटी दिसून आल्या आहेत. कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. मात्र त्याला पहिल्या सामन्यात हवी तशी छाप सोडता आली नाही. झिम्बाब्वेने टीम इंडियाला विजयासाठी 115 धावांचं सोपं आव्हान दिलं होतं. मात्र भारतीय संघाल सर्वबाद 113 धावा करता आल्या. या पराभवामुळे शुबमन गिलच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळाला एक डाग लागला आहे. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात दुबळ्या झिम्बाब्वेने पराभवाची धूळ चारली. यामुळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि शुबमन गिलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शुबमन गिल म्हणाला की, “आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करून. विकेट कालसारखीच दिसत आहे. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करणं चांगलं राहील. खेळपट्टी ड्राय आहे. तसेच सूर्यप्रकाशही प्रखर आहे. फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे. खलील ऐवजी सुदर्शनला संघात घेतलं आहे.”

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की, “चांगल्यापैकी ऊन पडलं असून विकेट चांगलं दिसत आहे. तरीही आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती. ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण आहे., आम्ही एका कारणासाठी येथे आहोत आणि आमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”  मालिकेतील पहिलाच सामना जिंकल्याने झिम्बाब्वेचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. तर टीम इंडियाचा कर्णधाराने प्लेइंग 11 मध्ये बदल करून ताकही फुंकून पिणार असल्याचं दाखवून दिलं आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.