IND vs ZIM 3rd T20 : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, शुबमन गिलने फलंदाजी घेत अशी निवडली प्लेइंग इलेव्हन
भारत झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना होत आहे. यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. कर्णधार शुबमन गिलने प्रथम फलंदाजी घेत दिग्गज खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. या संघात कोण कोण आहे ते जाणून घेऊयात
भारत झिम्बाब्वे टी20 मालिकेतील तिसरा सामना होत आहे. या सामन्यातही नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं आहे. मागच्या सामन्यात प्रथम फलंदाजी घेऊन झिम्बाब्वेचा 100 धावांनी धुव्वा उडवला होता. आता पुन्हा एकदा टीम इंडियाचा तसाच प्रयत्न असणार आहे. तिसरा टी20 सामना जिंकून मालिकेत 2-1 ने आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मागच्या सामन्यातील खेळी पाहता विजयाचं पारडं टीम इंडियाच्या झुकलेलं असेल यात शंका नाही. त्यात दिग्गज खेळाडू झिम्बाब्वेत आल्याने संघ आणखी मजबूत झाला आहे. कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकल्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण असेल ते देखील सांगून टाकलं आहे. संघात यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि संजू सॅमसनची एन्ट्री झाली आहे. यशस्वी जयस्वाल शुबमन गिलसोबत ओपनिंग करताना दिसेल. तर स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल.
“आम्ही प्रथम फलंदाजी करू. आशा आहे की खेळपट्टीवरील ओलावा आम्हाला मदत करेल. आम्हाला वर्ल्डकप परत मिळाला आहे. संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांना संघात घेतलं आहे. मुकेशला विश्रांती दिली असून खलील अहमदला स्थान दिलं आहे, मला वाटते की आमची बाजू संतुलित आहे.”, असं कर्णधार शुबमन गिल याने सांगितलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा
दोन्ही संघांचे खेळाडू
झिम्बाब्वे संघ: इनोसंट काईया, वेस्ली माधेवरे, ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा, ब्रँडन मावुता, तादिवानाशे मराझुम, आशीर्वाद , अंतुम नक्वी.
भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, तुषार देशपांडे, यशस्वी जैस्वाल , शिवम दुबे.