Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs zim 4th T20 : मानलं बरं का! झिम्बाब्वेने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडत भारताविरूद्ध रचला महारेकॉर्ड

ind vs zim 4th T20 : टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये सुरू असलेल्या चौथ्या टी-20 सामन्यामध्ये यजमानांनी मोठा विक्रम आपल्या नाावावर केला आहे. युवा टीम इंडियासमोर खेळताना आपला 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.

ind vs zim 4th T20 : मानलं बरं का! झिम्बाब्वेने 10 वर्षांचा रेकॉर्ड मोडत भारताविरूद्ध रचला महारेकॉर्ड
Follow us
| Updated on: Jul 13, 2024 | 6:28 PM

टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये चौथा टी-20 सामना सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान झिम्बाब्वेने टीम इंडियाविरूद्ध बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये 152-7 धावा केल्यात. कॅप्टन सिंकदर रझा याने सर्वाधिक 46 धावांची खेळी केलीये. टीम इंडियाविरूद्ध झिम्बाब्वेच्या सलामीवीरांनी इतिहास रचला, 2015 साली रचलेला विक्रम मोडला असून नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

झिम्बाब्वेने टीम इंडियाविरूद्ध डावाला दमदार सुरूवात केली, सुरूवातीला सावध खेळ करत पॉवर-प्ले मध्ये एकही विकेट जाऊ दिली नाही.  वेस्ली मधेवेरे आणि तादिवानाशे मारुमणी यांनी 63 धावांची सलामी दिली. या भागीदारीच्या जोरावर टीम झिम्बाब्वेने नवीन विक्रम रचला. याआधी 2015 साली सीजे चिभाभा आणि एच मसाकादझा यांनी 55 धावांची सलामी दिली होती.

टीम इंडियाविरूद्ध आज मैदानामध्ये उतरलेल्या वेस्ली मधेवेरे आणि तादिवानाशे मारुमणी यांनी हा विक्रम मोडून काढलाय. टीम इंडियाचे बॉलर तुषार देशपांडे आणि खलील अहमद यांना एकही विकेट मिळवून दिली नाही.

झिम्बाब्वेची बॅटींग

झिम्बाब्वेने पहिल्यांदा बॅटींग करताना सलामीवीरांनी 63 धावांची सलामी दिली. त्यानंतर सिकंदर रझा सोडता इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरा धावसंख्या गाठता आली नाही.  सिकंदर रझा याने 28 बॉलमध्ये 48 धावा केल्या, यामध्ये त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (C), जोनाथन कॅम्पबेल, फराज अक्रम, क्लाइव्ह मदांडे (WK), रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल (C), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (WK), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, खलील अहमद

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.