IND vs ZIM 4th T20 : भारत वि. झिम्बाब्वेमधील चौथ्या निर्णायक टी-20 सामन्यासाठी लावा ही Dream 11, व्हा मालामाल
IND vs ZIM 4th T20 : टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील चौथ्या टी-20 सामन्यासाठी ड्रीम 11 टीम लावत असाल तर खाली दिलेल्या संघाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आजचा सामना निर्णाय असणार आहे.
टीम इंडिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील आज चौथा टी-20 सामना होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला तर विजयी आघाडी टीम इंडिया घेणार आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात ड्रीम 11 लावत असाल तर खाली दिलेल्या संघाची तुम्हाला मदत होऊ शकते.
टी-20 क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये 11 सामने झाले आहेत. या 11 सामन्यांपैकी भारताने 8 वेळा विजय मिळवला आहे, तर झिम्बाब्वेने 3 सामने जिंकले आहेत. टीम इडियाचं पारडं जड मानलं जात असलं तर झिम्बाब्वेची टीम कडवा प्रतिकार करताना दिसत आहे. टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमधील हा सामना 4.30 वाजता सुरू होणार आहे. सामन्याचा टॉस 4 वाजता होणार आहे. सोनी लिव्ह किंवा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर चौथा T20I सामना पाहू शकता.
टीम इंडिया वि. झिम्बाब्वे ड्रीम 11
यष्टिरक्षक : संजू सॅमसन फलंदाज: शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, वेसली माधेवरे, डायन मायर्स अष्टपैलू: अभिषेक शर्मा, सिकंदर रझा गोलंदाज: रवी बिश्नोई, खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर, ब्लेसिंग मुझाराबानी कर्णधार- शुबमन गिल उपकर्णधार- सिकंदर रझा
टम इंडिया: शुभमन गिल C), यशवी जैस्वाल, अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, संजू सॅमसन (WK), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद, आवेश खान
झिम्बाब्वे: तादिवानाशे मारुमणी, डिओन मायर्स, वेस्ली मधवेरे, जोनाथन कॅम्पबेल, सिकंदर रझा (C), ब्रायन बेनेट, क्लाइव्ह मदांडे, तेंडाई चतारा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी, रिचर्ड नागरावा