IND vs ZIM: शुबमन गिलसोबत ओपनिंगला कोण उतरणार? कर्णधाराने एक दिवस आधीच केलं स्पष्ट

शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाचं नवं पर्व सुरु होणार आहे. टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर टीम इंडिया पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. युवा खेळाडूंना आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी चांगली संधी आहे. चांगली खेळी करणाऱ्या खेळाडूंचा पुढच्या मालिकेत विचार केला जाईल. तसेच फॉर्म कायम राहिला तर टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

IND vs ZIM: शुबमन गिलसोबत ओपनिंगला कोण उतरणार? कर्णधाराने एक दिवस आधीच केलं स्पष्ट
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 11:13 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं उत्साह मावळत असताना आता नव्या संघाकडे मोठ्या आशेने पाहिलं जात आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाच्या युवा खेळाडूंकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पाच सामन्यात व्हाईट वॉश देणार की टफ फाईट होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. भारताचा पहिला सामना 6 जुलैला होणार आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडिया कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत उतरणार याचीही उत्सुकता लागून आहे. खासकरून शुबमन गिलसोबत ओपनिंगला कोण उतरणार? हा प्रश्न अनेकांना पडलाय. असं असताना या सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलने प्लेइंग इलेव्हनबाबत काही महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. यात त्याने त्याच्यासोबत ओपनिंगला कोण येणार? हे स्पष्ट केलं आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी शुबमन गिलने स्पष्ट केलं की, स्वत: ओपनिंगला उतरणार आहे. त्याची साथ देण्यासाठी अभिषेक शर्मा की ऋतुराज गायकवाड उतरणार हा प्रश्न आहे. पण कर्णधार शुबमन गिलने आपला लहानपणीचा मित्र अभिषेक शर्माला पसंती दिली आहे. गिलने स्पष्टच सांगितलं की, डावखुरा आक्रमक फलंदाज अभिषेक त्याच्यासोबत मैदानात ओपनिंग करेल. तर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. शुबमन गिलने या व्यतिरिक्त प्लेइंग इलेव्हनबाबत काहीच सांगितलं नाही. दुसरीकडे, टीम इंडियात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा जागा घेण्याची इच्छाही शुबमन गिलने व्यक्त केली.

टी20 वर्ल्डकपनंतर विराट रोहितने टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये ओपनिंगची जागा रिकामी झाली आहे. एका जागेवर यशस्वी जयस्वालचं खेळणं जवळपास निश्चित आहे. तर दुसऱ्या जागेवर आता शुबमन गिलने दावा ठोकला आहे. गिलने सांगितलं की, रोहित ओपनिंग करत होता. तर वर्ल्डकपमध्ये विराटने ओपनिंग केली. मी सु्द्धा ओपनिंग करतो. त्यामुळे टी20 टीममध्ये ओपनिंग करू इच्छितो.

पहिल्या दोन सामन्यासाठी संघ

टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा.

झिम्बाब्वे संघ : सिकंदर रझा (कर्णधार), डियान मायर्स, इनोसंट कैया, मिल्टन शुम्बा, अंतुम नकवी, ब्रँडन मावुता, ब्रायन बेनेट, फराज अक्रम, जोनाथन कॅम्पबेल,विस्ले मधेवेरे, क्लाइव मडांडे, तदिवानाशे मारुमणी, ब्लेसिंग मुझराबानी, ल्यूक जोंगवेस रिचर्ड एनगारवा, तेंदई चतारा, वेलिंग्टन मसकाडझा.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.