IND vs ZIM : चौथ्या टी20 सामन्यात खेळपट्टी कोणाला मदत करणार? हवामान आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात चौथा टी20 सामना शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर मालिका खिशात टाकणार आहे. तर झिम्बाब्वे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दरम्यान हरारेची खेळपट्टी कोणाला मदत करणारी आहे ते जाणून घेऊयात.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून भारताने 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताला मालिका विजयासाठी आणि झिम्बाब्वेला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी चौथा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा काही बदल नसेल. कारण तिसऱ्या सामन्यात बरंच डोकेफोडी करून खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं गेलं आहे. फार तर खलील अहमदच्या जागी मैदानात मुकेश कुमारला संधी मिळू शकते. या व्यतिरिक्त प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणं खूपच कठीण दिसत आहे. तरी कर्णधार शुबमन गिल कोणत्या खेळाडूंसह मैदानात उतरणार याची उत्सुकता आहे. दरम्यान स्थानिक वेळेनुसार दुपारी 1 वाजता आणि भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. अक्युवेदरच्या अहवालानुसार, या दिवशी तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. सामन्यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 9 किमी असू शकतो. म्हणजे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही.
मागच्या तीन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाची संधी मिळाली आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. या खेळपट्टीवर आतापर्यंत एकूण 44 सामने खेळले असून त्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ 24 वेळा जिंकला आहे. तर 18 वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. या मैदानावर सरासरी धावसंख्या ही 160 च्या आसपास राहिली आहे. त्याच्यावर धावा केल्या तर गाठणं कठीण होतं असं दिसतंय.
दोन्ही संघांचे खेळाडू
टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), यशवी जयस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, रियान पराग, ध्रुवा जुरेल, खलील अहमद, तुषार देशपांडे .
झिम्बाब्वे संघ : सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, जोनाथन कॅम्पबेल, तेंडाई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसंट केया, क्लाइव्ह एम, वेस्ली मेदवेरे, टी मारुमनी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्रेंडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, नाताम कुमारी, डेनिश मायबानी , रिचर्ड अंगारावा, मिल्टन शुम्बा.