IND vs ZIM T20 : कर्णधार गिलची ‘शुभ’ सुरुवात, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच टी20 मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बाब्वेला गेली आहे. या मालिकेत भारताचं नेतृत्व शुबमन गिलच्या हाती दिलं आहे. संपूर्ण नवखा संघ असून क्रीडारसिकांना खूप अपेक्षा आहेत.

IND vs ZIM T20 : कर्णधार गिलची 'शुभ' सुरुवात, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 4:16 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. या मालिकेचं नेतृत्व शुबमन गिलकडे असून संपूर्ण संघ नवखा आहे. या संघाकडून भविष्याच्या दृष्टीकोनातून बऱ्याच अपेक्षा आहेत. झिम्बाब्वे विरुद्धचा पहिला टी20 सामना जिंकून विक्रम करण्याची संधी देखील आहे. भारताने आतापर्यंत सलग 12 सामने जिंकले आहेत. अजून 1 सामना जिंकला तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकण्याचा विक्रम प्रस्थापित होईल. कसोटी खेळणाऱ्या संघात भारताला मानाचं स्थान मिळणार आहे. तर दुसरा टी20 सामना जिंकला तर सर्वच पातळींवर भारतीय संघाचा गौरव होईल. दरम्यान शुबमन गिलच्या नेतृत्वात जवळपास संपूर्ण संघच नवा असणार आहे. त्यामुळे झिम्बाब्वे हा संघ दुबळा असला तरी भारताची कसोटी लागणार आहे. पाच सामन्यांसाठी झिम्बाब्वेदेखील सज्ज झाली आहे. झिम्बाब्वेला कमी लेखनं महागात पडू शकतं. झिम्बाब्वेने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि अजिंक्य रहाणे कर्णधार असताना पराभूत केलं आहे. या दोन्ही संघात एकूण 8 सामने झाले. त्यापैकी 6 सामन्यात भारताने तर 2 सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला आहे.  दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकून शुबमन गिलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शुबमन गिलने सांगितलं की, “आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. मला वाटते की ते एक चांगली खेळपट्टी दिसत आहे. नंतर फारसा बदल होणार नाही.आम्ही 11 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धा जिंकली. तुमच्याकडून नेहमी काही अपेक्षा असतात. आमच्याकडे तीन नवोदित खेळाडू आहेत. अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रियान पराग पदार्पण करत आहेत.”

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने सांगितलं की, “प्रथम फलंदाजी करायला माझी हरकत नाही. विकेट चांगली दिसते. या संक्रमणाच्या टप्प्यात झिम्बाब्वे क्रिकेटने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मी तरुण खेळाडूंसह लढण्यासाठी सज्ज आहे. या संघाचं नेतृत्व करणे अभिमानस्पद आहे आहे. सीन निवृत्त झाला आहे. त्यामुळे हा संपूर्ण तरुण संघ आहे. भविष्यात एर्विनची भूमिका असेल.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेस्ली मधेवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, रुतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.