Video : गुरू असावा तर असा! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीवर गुरू युवराज सिंह फिदा, पण म्हणाला…

Yuvraj Singh on Abhishek Sharma : टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा याने वादळी शतक ठोकत आपला परिचय करून दिला. हा गडी युवराज सिंहच्या तालमीत घडलाय, पहिल्या शतकानंतर युवराजने त्याचं अभिनंदन केलं त्यासोबतच एक व्हिडीओ पोस्ट केलाय.

Video : गुरू असावा तर असा! अभिषेक शर्माच्या वादळी खेळीवर गुरू युवराज सिंह फिदा, पण म्हणाला...
Yuuvraj-Singh- post video Abhishek-Sharma after hundred
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 11:35 PM

टीम इंडिया आणि झिम्बाब्वेमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये अभिषेक शर्माने वादळी शतकी खेळी करत वर्ल्ड रेकॉर्ड रचले. आयपीएलमध्ये केलेल्या धडाकेबाज बॅटींगनंतर टीम इंडियामध्ये त्याला स्थान मिळालं. मात्र पहिल्या सामन्यात भोपळाही न फोडता अभिषेक आऊट झाल्यामुळे त्याच्यावर टीका झाली. पण हार मानेल तो अभिषेक कसला, पठ्ठ्याने अवघ्या 46 बॉलमध्ये 7 चौकार आणि 8 षटकारांचा पाऊस पाडत 100 धावा केल्या. आपल्या करियरमधील दुसऱ्याच सामन्यात त्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाला गवसणी घातली. अभिषेक शर्माकडे टीम इंडियाचं भविष्य म्हणून पाहिलं जातंय. अशातच अभिषेकचा गुरू टीम इंडियाचा माजी खेळाडु युवराज सिंह याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेक शर्माच्या शतकानंतर युवराजने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अभिषेक शर्मा याने कशा प्रकारे मेहनत घेतली हे दिसत आहे. खेळाडू खेळताना दिसतो पण त्याआधी अशा कामगिरीसाठी किती मेहनत घेतलेली असते ते हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.

पाहा व्हिडीओ:-

युवराजने या पोस्टमध्ये अभिषेक यांचं कौतुक करताना, ‘रोम एका दिवसात बांधून झालं नाही, असं म्हटलं. याचा अर्थ असा की  तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करायचं असेल तर त्याला कष्टाशिवाय पर्याय नाही. पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकसाठी अभिनंदन, भविष्यात असे आणखी टप्पे गाठायचे असल्याचंही युवराजने म्हटलं आहे.

अभिषेक शर्मा याने 46 बॉलमध्ये शतक पूर्ण करत टी-२० मध्ये टीम इंडियाकडून वेगवान शतक करण्याच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. रोहित शर्मा 35 बॉलसह पहिल्या क्रमांकावर, दुसऱ्या स्थानी सुर्यकुमार यादव 45 बॉल तर अभिषेक शर्मा आणि के.ल. राहुल दोघे 46 बॉलसह तिसऱ्या स्थानी आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.