IND vs ZIM T20 : झिम्बाब्वेने भारताच्या या दोन दिग्गज कर्णधारांना दिला आहे धक्का, टी20मध्ये चारलीय पराभवाची धूळ

टी20 क्रिकेटमध्ये कधी कोणता संघ कोणावर भारी पडेल सांगता येत नाही. दिग्गज संघांना अनेकदा पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. अशी अनेक उदाहरण आतापर्यंत समोर आली आहेत. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यात आपलंच पारडं असं समजणं महागात पडून शकतं. टीम इंडियाच्या दोन कर्णधारांनी ही अनुभूती घेतली आहे.

IND vs ZIM T20 : झिम्बाब्वेने भारताच्या या दोन दिग्गज कर्णधारांना दिला आहे धक्का, टी20मध्ये चारलीय पराभवाची धूळ
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 3:21 PM

भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. टीम इंडियाचं नेतृत्व शुबमन गिलकडे आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात संपूर्ण नवखा संघ आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा बोलबालाही आहे. भारतीय संघाने वर्ल्डकप जेतेपद मिळवून हे सिद्धही करून दाखवलं आहे. त्यामुळे पाच सामन्यांची मालिका टीम इंडिया सहज जिंकेल असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे. पण कमी लेखण्याची चूक करणं महागात पडू शकतं. कारण झिम्बाब्वेने दोन दिग्गज कर्णधारांना या आधी धक्का दिला आहे. त्यामुळे शुबमन गिलने ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताला दोनदा पराभूत केलं आहे. महेंद्रसिंह धोनी आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात हा पराभव सहन करावा लागला आहे. भारताने आतापर्यंत झिम्बाब्वे विरुद्ध 8 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात भारताने, तर 2 सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला आहे.

2015 मध्ये झिम्बाब्वेने भारताला 10 धावांनी पराभूत केलं होतं. तेव्हा या संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर होती. झिम्बाब्वेने 145 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र टीम इंडियाला फक्त 135 धावा करता आल्या होत्या. या सामन्यात रॉबिन उथप्पाने 42 धावा केल्या होत्या. तर स्टूअर्ट बिन्नीने 24 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र इतर खेळाडूंना हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा 2016 मध्ये भारतीय संघ महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 2 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. झिम्बाब्वेने 170 धावांच लक्ष्य दिलं होतं. पण भारताचा डाव 168 धावांवर आटोपला. या सामन्यात मनिष पांडेने 48 धावा केल्या होत्या.

दोन्ही संघाचे खेळाडू

टीम इंडिया : शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद, रवी बिश्नोई, साई सुदर्शन, जितेश शर्मा, तुषार देशपांडे, हर्षित राणा.

झिम्बाब्वे संघ : सिकंदर रझा (कर्णधार), डियान मायर्स, इनोसंट कैया, मिल्टन शुम्बा, अंतुम नकवी, ब्रँडन मावुता, ब्रायन बेनेट, फराज अक्रम, जोनाथन कॅम्पबेल,विस्ले मधेवेरे, क्लाइव मडांडे, तदिवानाशे मारुमणी, ब्लेसिंग मुझराबानी, ल्यूक जोंगवेस रिचर्ड एनगारवा, तेंदई चतारा, वेलिंग्टन मसकाडझा.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.