IND W vs BAN W : सामना बरोबरीत सुटल्यानंतरही सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या या मागचं कारण

IND W vs BAN W : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली. पण सुपर ओव्हर का केली नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

IND W vs BAN W : सामना बरोबरीत सुटल्यानंतरही सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या या मागचं कारण
IND W vs BAN W : सामना टाय झाल्यानंतर क्रीडाप्रेमींना वाटलं की सुपर ओव्हर होईल, पण झालीच नाही कारण...
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 8:27 PM

मुंबई : भारत आणि बांगलादेश वुमन्स संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. ही मालिक 1-1 ने बरोबरीत सुटल्याने जेतेपद वाटून देण्यात आलं आहे. पण शेवटचा आणि निर्णायक सामना बरोबरीत सुटूनही सुपर ओव्हर का केली नाही असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 225 धावा केल्या आणि विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने सर्वगडी बाद 225 धावा केल्या त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने दिला जाईल असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. त्या मागचं कारणही विचित्र आहे.

भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती. तर बांगलादेशला विजयासाठी एका विकेटची गरज होती. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच भारताला दोन धावा मिळाल्या. त्यामुळे सामना बरोबरीत आला आणि विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता होती. पण तिसऱ्या चेंडूवर मेघना सिंह आऊट झाली आणि सामना बरोबरीत सुटला. क्रीडाप्रेमींना वाटलं आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून केला जाईल, पण तसं केलं नाही.

सुपर ओव्हर न करण्यामागचं कारण काय?

सुपर ओव्हन न करण्यामागे विचित्र कारण पुढे आलं आहे. समालोचकाच्या मते सामन्याचं शेड्युल टाईम पूर्ण झालं होतं. त्यामुळे सुपर ओव्हर खेळली गेली नाही. कारण हा सामना उशिरापर्यंत चालला असं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या डावात सामना पावसामुळे काही काळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे वेळ वाया गेला. तसेच बांगलादेश 50 षटकं, तर भारताने 49.3 षटकं खेळली. पण वातावरण ढगाळ नसताना किंवा पाऊस नसताना असं का केलं असा प्रश्नही विचारला जात आहे.

बांगलादेशला झालं असतं नुकसान

सुपर ओव्हर खेळला गेला असता. या मैदानात आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. त्यामुळे सर्वकाही व्यवस्थिती होतं. पण यामागे वेगळंच कारण असल्याचं बोललं जात आहे. हा सामना आयसीसी वुमन्स चॅम्पियनशिपचा भाग होता. यातून 2025 साली वुमन्स वर्ल्डकपसाठी क्वॉलिफाय होणार आहे. सुपर ओव्हर न झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

या सामन्याचा निकाल आला असता तर एका संघाचे दोन गुण झाले असते. पण हा सामना बांगलादेश हरला असता तर मात्र अडचण झाली असती. वुमन्स वर्ल्डकप भारतात असल्याने भारत क्वॉलिफाय आहे. पण बांगलादेशचं एक गुणामुळे नुकसान झालं आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.