IND W vs ENG W : शेवटच्या टी- 20 सामन्यात इंग्लंडने जिंकला टॉस, टीम इंडियामध्ये मोठा बदल
IND W vs ENG W Toss : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स इंग्लंडमधील तिसऱ्या टी-20 सामना काही वेळात सुरू होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल केला असून स्टार खेळाडूला संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स इंग्लंड संघामधील तिसरा टी-20 सामना काही वेळात सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिसराही सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाला विजय मिळवणावाच लागणार आहे. कारण आधीच तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंडने 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे शेवटचा टी-20 सामना जिंकत गोड शेवट करण्याचा हरमनप्रीत कौर अँड कंपनीचा प्रयत्न असेल. टीम इंडियाने आजच्या सामन्यात मोठा बदल केला आहे.
मागील सामन्यामध्ये सबस्टीट्युट खेळाडू म्हणून संघात अमनजोत कौर हिला प्लेइंग 11 मध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. पूजा वस्त्राकर हिच्या जागी तिला संघाता सामील करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मागील दोन सामन्यांमध्ये पूजा खास काही करू शकली नाही. शेवटच्या सामन्यामध्ये अमनजोतची निवड केल्याने निकालात काही बदल पाहायला मिळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इंग्लंड संघानेही आपल्ट संघामध्ये चार बदल केले आहेत. माइया बौचियर, डॅनियल गिब्सन, बेस हीथ आणि माहिका गौर यांना आजच्या प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली आहे. आजच्या सामन्यामध्ये इग्लंडची ओपनर सोफिया डंकले ही तिचा करिअरमधील 50 वा टी-20 सामना खेळत आहे.
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (W), श्रेयंका पाटील, तितस साधू, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, माइया बौचियर, अॅलिस कॅप्सी, हीदर नाइट (C), एमी जोन्स (W), डॅनियल गिब्सन, बेस हीथ, फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, माहिका गौर