Ind W vs Sa W 2nd T-20 : भारताचा आफ्रिकेवर 10 विकेटने दणदणीत विजय, मालिका बरोबरीत
Ind W vs Sa W : महिल भारतीय संघाने चिदंरबरम येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये 10 विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिका संघाला अवघ्या 84 धावांवर आऊट केल्यानंतर भारताच्या शेफाली आणि स्मृती दोघींनी विकेट न गमवता 11व्या ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

महिला भारतीय संघ आणि महिला दक्षिण आफ्रिका संघामध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघाने दहा विकेटने विजय मिळवलाय. भारताकडून सलामीला उतरलेल्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी एकही विकेट न गमावता 84 धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या टी-20 मध्ये दोन्ही संघांना विजय मिळवावा लागणार आहे.
भारताकडून फलंदाजीला उतरलेल्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी सावध सुरूवात केली. कमी लक्ष्य असल्याने घाई न करता भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून स्मृती मंधाना हिने नाबाद 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि 2 षटकार मारले. तर शेफाली वर्माने २५ बॉलमध्ये ३ चौकारांच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या.
महिला भारतीय संघाने सुरूवातीपासून दक्षिण आफ्रिका संघाला बॅकफूटवर ठेवलं होतं. श्रेयांका पाटीलने पहिली विकेट मिळवली त्यानंतर पूजा वस्त्रातर आणि राधा यादवसमोर आफ्रिकेच्या एकाली खेळाडूला मोठी खेळी करत डाव सावरता आला नाही. ताजमिन ब्रिट्स हिने सर्वाधिक 20 धावांची खेळी केली, आफ्रिका संघाच्या सात खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
भारताची प्लेइंग इलेव्हन: शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), एस सजना, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, अरविंद पाटील, अरविंद राधा यादव.
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, ॲनेके बॉश, ॲने डेर्कसेन, एलिस-मेरी मार्क्स, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.