IND w vs ENG w | टीम इंडियाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, तिसऱ्याच दिवशी पॅकअप
IND W vs AUS W : तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वुमन्स टीम इंडियाने वुमन्स इंग्लंड महिला संघावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महिला भारतीय संघाचा हा इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला आहे.
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारताच्या महिला ब्रिगेडने 347 धावांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय महिला संघाने 428 धावांचा डोंगर उभारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ गडगडला, त्यांना फक्त 136 धावा करता आल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 186 धावा करत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 478 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावातही अवघ्या 131 धावांवर ऑल आऊट झाला होता. भारताकडून दीप्ती शर्माच्या फिरकीसमोर इंग्लंडचे खेळाडू फेल ठरले अन् महिला ब्रिगेडने ऐतिहासिक विजय मिळवला.
तिुसऱ्या दिवशी इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी 479 धावांचं लक्ष्य होतं. या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरूवात एकदम खराब झाली होती. सातव्याच ओव्हरमध्ये इंग्लंड संघाला पहिला धक्का रेणूक सिंह ठाकूर हिने दिला. त्यानंतर परत एकदा दहाव्या ओव्हरमधील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर भारताला पूजा वस्त्राकर हिन दोन विकेट मिळवून दिल्या. यामध्ये सोफिया डंकले 15 धावा आणि नेट सायवर-ब्रंट 0 धावांवर आऊट झाल्या.
Congratulations #TeamIndia 🇮🇳
What an epic win in the Test match against England! A true team performance that saw collective effort.
I recall conversations with @ImHarmanpreet and @mandhana_smriti on the value of the truest format for a cricketer and to see the team do well… pic.twitter.com/DjdtZVw7PW
— Jay Shah (@JayShah) December 16, 2023
पूजाने घातक इंग्लंडची कॅप्टन हीथर नाइट हिला 21 धावांवर आऊट करत चौथी विकेट घेतली. इंग्लंड संघावरील दबाव वाढला होता. त्यानंंतर दीप्ती शर्मा हिने चार तर राजेश्वरी गायकवाडने दोन विकेट घेतल्या. दीप्तीने लॉरेन बेलला आऊट शेवटची विकेट घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय
भारतीय महिला क्रिकेट संघाचा कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. इंग्लंडवरही कसोटीमध्ये भारतीय संघाने पराभव केला आहे. याआधी संघाने श्रीलंका संघाने पाकिस्ताविरूद्ध 309 धावांनी विजय मिळवला होता. मुंबईतील वानखेडे मैदानावर भारताच्या पोरींनी इंंग्लंड संघाला पराभूत करत इतिहास रचला आहे. इंग्लंडवर भारतीय महिला संघाने 347 धावांनी विजय मिळवला आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | स्मृति मंधाना (कॅप्टन) , शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्नेह राणा, शुभा सतीश, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकुर सिंह आणि राजेश्वरी गायकवाड.
इंग्लंड क्रिकेट टीम | हीथर नाइट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, सोफिया डंकले, नेट सायवर-ब्रंट, डेनिएल व्याट, एमी जोन्स (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर आणि लॉरेन बेल.