IND A vs AUS A : कॅप्टन ऋतुराज सलग दुसऱ्या डावातही फ्लॉप, टीम इंडियाची अडखळत सुरुवात

Ruturaj Gaikwad Dismissed On 5 Runs : टीम इंडिया ए चा कर्णधार ऋतुराज गायकवाड ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या पहिल्या अनधिकृत सामन्यातील दुसर्‍या डावात अपयशी ठरला आहे.

IND A vs AUS A : कॅप्टन ऋतुराज सलग दुसऱ्या डावातही फ्लॉप, टीम इंडियाची अडखळत सुरुवात
ruturaj gaikwad out on 5 runs
Follow us
| Updated on: Nov 01, 2024 | 12:03 PM

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-2025 आधी टीम इंडिया ए ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ए ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात पहिला अनधिकृत कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पहिल्या डावात 107 धावांवर ऑलआऊट करुन प्रत्युत्तरात 195 रन्स करत 95 धावांची निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. टीम इंडियाचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. ऋतुराजला पहिल्या डावात तर भोपळाही फोडता आला नाही. ऋतुराजने दुसऱ्या डावात खातं उघडलं, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही.

ऋतुराज पहिल्या डावात झिरोवर आऊट झाल्याने त्याच्याकडून दुसऱ्या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. तसेच 88 धावांनी पिछाडीवर असल्याने मोठी खेळी करण्याचं दडपणही होतं. मात्र ऋतुराज त्यात अपयशी ठरला. ऋतुराजच्या रुपात भारताने दुसऱ्या डावात पहिली विकेट गमावली. फर्गस ओ नील याने ऋतुराज गायकवाड याला कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट याच्या हाती 5 धावांवर कॅच आऊट करत ऑस्ट्रेलियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर भारताने 30 धावांवर दुसरी विकेट गमावली. अभिमन्यू ईश्वरन 12 धावांवर बाद झाला.

त्यानतंर साई सुदर्शन आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी नाबाद शतकी भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 2 विकेट्स गमावून 43 षटकांमध्ये 146 धावा केल्या आहेत. मुंबईने यासह 58 धावांची आघाडी घेतली आहे. तर साई सुदर्शन 122 बॉलमध्ये 4 फोरसह 62 रन्सवर नॉट आऊट आहे. तर देवदत्त पडीक्कल याने 104 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या आहेत.

ऋतुराजला दुसऱ्या डावातही अपयशी

ऑस्ट्रेलिया ए प्लेइंग ईलेव्हन: नॅथन मॅकस्विनी (कॅप्टन), सॅम कोन्स्टास, मार्कस हॅरिस, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, ब्यू वेबस्टर, कूपर कोनोली, जोश फिलिप (विकेटकीपर), फर्गस ओ नील, टॉड मर्फी, ब्रेंडन डॉगेट आणि जॉर्डन बकिंगहॅम.

टीम इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू इश्ववरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, बाबा इंद्रजीथ, इशान किशन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, मानव सुथार, नवदीप सैनी, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.