बीसीसीआय Shubman Gill ला प्रमोशन देणार, कॅप्टन बनवण्याच्या तयारीत

| Updated on: Aug 21, 2022 | 11:09 AM

झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीज मध्ये शुभमन गिलने चांगलं प्रदर्शन केलय. त्याने अर्धशतक झळकावतानाच संघाला फायद्याच्या ठरणाऱ्या उपयुक्त इनिंग खेळल्या आहेत. बीसीसीआयची निवड समिती शुभमन गिलच्या या प्रदर्शनाची दखल घेण्याच्या तयारीत आहे.

बीसीसीआय Shubman Gill ला प्रमोशन देणार, कॅप्टन बनवण्याच्या तयारीत
shubhaman-gill
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये मिळालेल्या संधीच त्याने सोनं केलं. आधी वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध मालिकेत त्यानंतर आता सुरु असलेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीज मध्ये शुभमन गिलने चांगलं प्रदर्शन केलय. त्याने अर्धशतक झळकावतानाच संघाला फायद्याच्या ठरणाऱ्या उपयुक्त इनिंग खेळल्या आहेत. बीसीसीआयची निवड समिती शुभमन गिलच्या या प्रदर्शनाची दखल घेण्याच्या तयारीत आहे. शुभमन गिलच प्रमोशन होऊ शकतं. बीसीसीआयकडून (BCCI) त्याची भारत ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते. पुढच्या महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यासाठी शुभमन गिलची वनडे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते. या सीरीजसाठी शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

कुठे होणार सामने?

सीरीज मधील तीन सामने बंगळुरु मध्ये तर तीन सामने चेन्नई मध्ये होणार आहेत. भारतीय ‘अ’ संघाचे सामने पुन्हा एकदा सुरु होत आहेत. कोविडमुळे हे सर्व सामने स्थगित झाले होते. भारतीय ‘अ’ संघातील कामगिरी लक्षात घेऊनच खेळाडूंना सीनियर संघात स्थान दिलं जातं. सध्याच्या भारतीय सीनियर संघातील बहुतांश खेळाडू भारतीय ‘अ’ संघातूनच आले आहेत. अशाच सीरीज मधून भारताने आपली बेंच स्ट्रेंथ मजबूत केली आहे.

वॉशिंग्टन सुंदरसाठी सीरीज महत्त्वाची

न्यूझीलंड ‘अ’ विरुद्धच्या या सीरीजच्या माध्यमातून वॉशिंग्टन सुंदरचा फिटनेसही लक्षात येईल. वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी त्याची निवड झाली होती. पण दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. सुंदरला खांद्याची दुखापत झाली आहे. लँकेशायरकडून काऊंटीकडून खेळताना त्याला ही दुखापत झाली होती.

कुठल्या खेळाडूंना संधी मिळेल?

मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीची भारतीय ‘अ’ संघात निवड होऊ शकते. आयपीएल मध्ये आरसबीकडून शतक झळकावणाऱ्या रजत पाटीदारला सुद्धा संधी मिळू शकते. भारतासाठी कुठले खेळाडू खेळू शकतात, त्याची चाचपणी करण्याच्या दृष्टीने ही सीरीज महत्त्वाची आहे. न्यूझीलंडने सुद्धा त्यांचा मजबूत संघ निवडला आहे. टॉम ब्र्युस त्यांचा कर्णधार आहे. त्यांच्या संघातही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.