Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया श्रीलंकेत दाखल, फोटो व्हायरल
Team India A Sri Lanka | टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी श्रीलंकेत दाखल झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कोलंबो | टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांना आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. या विंडिज दौऱ्यात टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या आशिया कप स्पर्धेचं मुख्य वेळापत्रक काही दिवसांआधी जाहीर झालंय. त्यानुसार 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान आशिया कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानला यजमानपदाचा मान मिळालाय. स्पर्धेतील एकूण 13 पैकी 9 सामने हे श्रीलंकेत तर 4 सामने हे पाकिस्तानमध्ये होणार आहेत.
मात्र आशिया कप स्पर्धेसाठी प्रत्येक संघाची घोषणा झालेली नाही. तसेच प्रत्येक टीमचं वेळापत्रकही जाहीर झालेलं नाही. मात्र याआधीच टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी श्रीलंकेत दाखल झाली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये गोंधळ उडालाय की संघ जाहीर न होताच टीम श्रीलंकेला पोहचली कशी? आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
आशिया कप स्पर्धेआधी एसीसी मेन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. ही स्पर्धा 13 ते 23 जुलै दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी यश धूळ याच्या नेतृ्त्वात टीम इंडिया ए आशिया कप खेळणार आहे. या एमर्जिंग आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचे युवा शिलेदार हे श्रीलंकेत दाखल झाले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंचं श्रीलंकेत जोरात स्वागत करण्यात आलं. श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले.
टीम इंडिया ए श्रीलंकेत दाखल
?? India 'A' Team has touched down in Sri Lanka for the Emerging Teams Asia Cup 2023! ???
We're all set to witness some incredible cricket action as the tournament gears up to kick off on 13th July in Sri Lanka. ??#accmensemergingteamsasiacup @ACCMedia1 pic.twitter.com/IS5rgnRxNB
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) July 10, 2023
या 50 ओव्हरच्या स्पर्धेत एकूण 8 टीम सहभागी होणार आहेत. हे एकूण 8 संघ 2 ग्रुपमध्ये विभागले आहेत. बी ग्रुपमध्ये टीम इंडिया ए, नेपाळ ए, यूएई ए आणि पाकिस्तान ए असे 4 संघ आहेत. तर ए ग्रुपमध्ये श्रीलंका ए, बांगलादेश ए, अफगाणिस्तान ए आणि ओमान ए या 4 संघांचा समावेश आहे.
टीम इंडिया एचं वेळापत्रक
टीम इंडिया ए विरुद्ध यूएई ए – 14 जुलै.
टीम इंडिया ए विरुद्ध नेपाळ ए – 17 जुलै.
टीम इंडिया ए विरुद्ध पाकिस्तान ए – 19 जुलै.
टीम इंडिया ए
यश धुल (कॅप्टन), अभिषेक शर्मा (उपकर्णधार), साई सुदर्शन, निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितीशकुमार रेड्डी आणि राजवर्धन हंगरगेकर.