4 महिन्यात 4 वेळा भारत-पाकिस्तान लढत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियात घमासान

गेल्या दोन वर्षांपासून आशिया चषकाभोवती असलेला गोंधळ अखेर शनिवारी संपला. ही स्पर्धा 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु त्यानंतर कोरोनामुळे ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 2021 मध्येही ती आयोजित करता आली नाही.

4 महिन्यात 4 वेळा भारत-पाकिस्तान लढत, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियात घमासान
IND vs PAK (Rohit Sharma - Babar Azam)Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 9:50 AM

मुंबई : भारत आणि पाकिस्तानचे (India vs Pakistan) पुरुष क्रिकेट संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात. उभय देशांमधील संबंध दहशतवाद आणि सीमेवरील तणावामुळे बिघडले आहेत. त्यामुळे गेल्या दशकभरात या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये एकही क्रिकेट मालिका खेळवण्यात आली नाही. दरम्यान, यंदा हे दोन संघ चार महिन्यात चार वेळा आमने सामने येऊ शकतात. दोन्ही देश या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत (ICC Men’s T20 World Cup 2022) भिडणार आहेत. परंतु त्याआधी दोन्ही संघांमध्ये एक सामना होणार आहे. हा सामना श्रीलंकेत खेळवला जाईल. श्रीलंकेत आशिया चषक 2022 स्पर्धा यावर्षी आयोजित केली जाईल. आशियाई क्रिकेट परिषदेने (Asia Cup 2022 Announced) शनिवारी 19 मार्च रोजी यंदाच्या आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाला मान्यता दिली आहे. ऑगस्टच्या अखेरीस ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत या स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

गेल्या दोन वर्षांपासून आशिया चषकाभोवती असलेला गोंधळ अखेर शनिवारी संपला. ही स्पर्धा 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु त्यानंतर कोरोनामुळे ती एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 2021 मध्येही ती आयोजित करता आली नाही आणि त्यानंतर 2022 मध्ये श्रीलंकेत T20 फॉरमॅटमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचे मान्य करण्यात आले आहे. शनिवारी 19 मार्च रोजी आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर औपचारिकपणे सहमती झाली आणि 27 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होईल.

27 ऑगस्टपासून 11 सप्टेंबरपर्यंत खेळवली जाणार स्पर्धा

आशियाई क्रिकेट परिषदेने ट्विट करून स्पर्धेच्या तारखांची माहिती दिली. त्यानुसार यावर्षी 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत ही स्पर्धा सुरू होणार असून ती 11 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. आशिया चषक स्पर्धेचा फॉरमॅट आतापर्यंत एकदिवसीय होता, परंतु यावेळी ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. याशिवाय 20 ऑगस्टपासून क्वालिफायर सामने होणार आहेत. सहा संघांच्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या आशियातील पाच कसोटी दर्जाच्या संघांना या स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांच्या आधारे निश्चित केला जाईल.

आशिया चषकात दोनदा सामना होणार

आशिया चषक स्पर्धा यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणार आहे. ही स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये आयोजित केली जाईल, ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान दोनदा भिडताना दिसतील. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात ते एकमेकांविरुद्ध नक्कीच उतरतील. दोघेही आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचल्यावर त्यांचा दुसरा सामना होऊ शकतो. म्हणजेच 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये दोन वेळा टक्कर पाहायला मिळेल.

T20 विश्वचषकातही दोन सामने होण्याची शक्यता

आशिया चषक संपल्यावर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या कार्यक्रमात 23 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तानमधला सामना ठरला आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे मैदान असलेल्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. पण 13 नोव्हेंबरलाही दोघांमध्ये दुसरी टक्कर पाहायला मिळू शकते. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

Women’s World Cup 2022: पूजा वस्त्राकरचा 81 मीटरचा षटकार, ठरला वर्ल्डकपमधला सर्वात लांब सिक्सर

IND vs AUS, Women’s World Cup 2022: सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग, भारताला धूळ चारत ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करुन टीम इंडियात स्थान मिळवणार; स्पर्धेआधी शिखर धवनचा निर्धार

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.