IND vs ENG 1st T20: पहिल्या T20मध्ये भारताचा इंग्लंडवर 50 धावांनी विजय! हार्दिक चमकला, रोहित शर्मानेही रचना खास विक्रम

IND vs ENG 1st T20: T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणारा आणि चार विकेट घेणारा हार्दिक हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. या विजयासह टीम इंडियानं T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND vs ENG 1st T20: पहिल्या T20मध्ये भारताचा इंग्लंडवर 50 धावांनी विजय! हार्दिक चमकला, रोहित शर्मानेही रचना खास विक्रम
Ind vs Eng 1st T20Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 7:20 AM

नवी दिल्ली : साउथहॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा (IND vs ENG) 50 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकांत आठ गडी गमावून 198 धावा केल्या. हार्दिक पांड्यानं 51 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 19.3 षटकांत 148 धावांवर गारद झाला. फलंदाजीनंतर हार्दिकनं (Hardik Pandya)  गोलंदाजीतही धडाका लावला आणि चार षटकांच्या कोट्यात 33 धावा करत चार बळी घेतले. त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा करणारा आणि चार विकेट घेणारा हार्दिक हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. या विजयासह टीम इंडियानं T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सलग 13 T20 सामने जिंकणारा रोहित (Rohit Sharma) जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. एजबॅस्टन कसोटीतील पराभवाचा बदलाही टीम इंडियाने घेतला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना शनिवारी बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. भारतीय सीनियर खेळाडू दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करतील. या सामन्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत पुनरागमन करणार आहेत.

सुरुवात खराब

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. टीम इंडियाला पहिला धक्का 29 च्या एकूण स्कोअरवर बसला. कर्णधार रोहित शर्मा 14 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीनं 24 धावा करून बाद झाला. यानंतर इशान किशनही 10 चेंडूत आठ धावा करून बाद झाला. या दोघांना फिरकीपटू मोईन अलीने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर दीपक हुडाने काही चांगले फटके मारले. मात्र, तो 17 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीनं 33 धावा करून बाद झाला.

हार्दिकचे अर्धशतक

यानंतर सूर्यकुमारने हार्दिक पांड्यासोबत चौथ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. सूर्या 19 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 39 धावा काढून बाद झाला. अक्षर पटेल 12 चेंडूत 17 धावा, दिनेश कार्तिक 7 चेंडूत 11 धावा आणि हर्षल पटेल 6 चेंडूत 3 धावा करून बाद झाला. यादरम्यान हार्दिकने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. तो 33 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 51 धावा करून बाद झाला.

हे सुद्धा वाचा

भुवनेश्वर कुमार एका धावेवर नाबाद राहिला आणि अर्शदीप सिंगने दोन धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय रीस टोपले, टायमल मिल्स आणि पार्किन्सन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

33 धावांत चार विकेट गमावल्या

199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने 33 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याने डावाच्या पहिल्याच षटकात इंग्लंडचा नवनियुक्त कर्णधार जोस बटलरला क्लीन बोल्ड केले. बटलरला खातेही उघडता आले नाही. यानंतर हार्दिक पांड्याची आगपाखड पाहायला मिळाली. त्याने पाचव्या षटकात दोन गडी बाद केले.

सामन्यात काय झालं?

हार्दिकने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड मलानला क्लीन बोल्ड केले. मालनला 14 चेंडूत 21 धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनला यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने झेलबाद केले. लिव्हिंगस्टोनला खातेही उघडता आले नाही. यानंतर हार्दिकने जेसन रॉयला हर्षल पटेलकडे झेलबाद केले. रॉय 16 चेंडूत 4 धावा काढून बाद झाला. हार्दिकच्या कामगिरीनंतर युझवेंद्र चहल थक्क झाला. त्याने 13व्या षटकात हॅरी ब्रुक आणि मोईन अली यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चहलने ब्रुकला सूर्यकुमार यादवकडून झेलबाद केले. ब्रुक 23 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकारासह बाद झाला. त्याचवेळी चहलने मोईनला यष्टिरक्षक कार्तिककडून यष्टिचित केले. मोईन 20 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 36 धावा काढून बाद झाला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.