IND vs SL | ‘आज त्याने दाखवून दिलं’, श्रीलंकेच्या पराभवानंतर विराट सोडून रोहितकडून टीममधील ‘या’ तीन खेळाडूंचं खास कौतुक!
IND vs SL : भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या सामन्यामध्ये लंकेचा पराभव करत भारताने वर्ल्ड कपमधील आपला सलग सातवा विजय मिळवला आहे. या सामन्यानंतर रोहितने एका खेळाडूचं तोंडभरून कौतुक केलं.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या सामन्यात रोहितसेनेना दर्जेदार विजय मिळवत लंकेचा तब्बल 302 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना प्रथम 357 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघाचा डाव अवघ्या 55 धावांवर आटोपला. भारताच्या गोलंदाजांनी लंकेचा सुफडा साफ केला. मोहम्मद शमी 5 विकेट, माहम्मद सिराज 3 विकेट आणि जसप्रीत बुमराह जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. या विक्रमी रोहित शर्मा याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला रोहित शर्मा?
टीम इंडिया सेमी फायनलमध्ये गेल्याने फार आनंद झाला. चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यापासून संघातील प्रत्येकाने मेहनत घेतली. उपांत्य फेरीत जागा मिळवत अंतिम फेरी गाठायची हे आमचं टार्गेट आहे. सातही सामन्यामध्ये सर्वांनी दमदार प्रदर्शन केलं. कोणत्याही पिचवर 350 धावा करणं मोठी गोष्ट आहे. श्रेयसची संघातील नेमकी काय भूमिका काय आहे आज त्याने दाखवून दिलं. येणाऱ्या सामन्यांमध्येही त्याच्याकडून अशीच अपेक्षा आहे. सिराज संघातील कौशल्यपूर्ण गोलंदाज आहे, सूर्यानेही इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात पाठी मागून येत मोक्याच्या वेळी धावा केल्या. मला आशा आहे की सगळेच खेळाडू अशीच कमगिरी करतील, असं रोहित शर्मा सामना संपल्यानंतर म्हणााला.
शुबमन गिल आणि विराट कोहली बाद झाल्यावर भारताच्या डावाची सूत्रे श्रेयस अय्यर याने आपल्या हातात घेतली होती. श्रेयस याने आक्रमक खेळी करत संघाची धावसंख्या 350 च्या पूढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या 56 बॉलमध्ये श्रेयसने 82 धावा केल्या यामध्ये त्याने 11 चौकार, 2 सिक्सर मारले.
भारत-श्रीलंका प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका