भारताने मालिका गमवल्यानंर WTC गुणतालिकेत उलथापालथ, पहिलं स्थान तर गमावलं आता…

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची मालिका सहज जिंकेल असं वाटत होतं. पण सर्वच भ्रमनिरास झाला. घड्याळाचे काटे उलटे फिरले आणि न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लिन स्वीप दिला. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे.

भारताने मालिका गमवल्यानंर WTC गुणतालिकेत उलथापालथ, पहिलं स्थान तर गमावलं आता...
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 3:23 PM

न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 25 धावांनी मात देत मालिका 3-0 ने जिंकली. या मालिकेपूर्वी भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित एकदम सोपं दिसत होतं. भारत सहज अंतिम फेरी गाठेल असं सांगितलं जात होतं. पण या मालिकेत सर्वच फासे उलटे पडले. न्यूझीलंडने भारतीय संघाला असा फिरवला की उठण्याची संधीच दिली आहे. या मालिकेत भारताच्या फलंदाजीचे चिंध्या उडाल्या. एखाद दुसरा फलंदाज खेळून जात होता. पण त्यांच्या कामगिरीतही सातत्य नसल्याचं दिसून आलं. विराट रोहितसारखे दिग्गज फलंदाज तर न्यूझीलंडसमोर नांगी टाकून गेले. यापूर्वी दक्षिण अफ्रिकेने 2000 साली भारताला क्लिन स्वीप दिला होता. आता जवळपास 24 वर्षांनी न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला आहे. भारताने ही मालिका गमवून बरेच नकोसे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही फटका बसला आहे. भारताला गुणतालिकेतील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचं गणितही किचकट झालं आहे.

भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले असून त्यापैकी 8 सामन्यात विजय, तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. यामुळे भारताची विजयी टक्केवारी 58.33 इतकी झाली आहे. त्यामुळे गुणतालिकेतील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. भारताने मालिका गमवल्याने ऑस्ट्रेलियाला फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 62.50 इतकी असून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे अंतिम फेरीचं भारताचं स्वप्न लांबलं आहे. भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला 5 पैकी 4 सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.

न्यूझीलंडने भारताला पराभूत केल्याने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडने 11 पैकी 6 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 54.55 टक्के झाली आहे. तर श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही 55.56 इतकी असून तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 54.17 असून पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चुरस आहे.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.