IND vs SL : टीम इंडियाचं आफ्रिकेला 327 धावांचं आव्हान, विराटची विक्रमी शतकी खेळी

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील सामन्यामध्ये भारताने 326 धावांचा डोंगर उभारला आहे. या सामन्यात किंग विराट कोहली याने सचिन तेंडुलकर याच्या शतकाची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिका भारताच्या विजयरथाला ब्रेक लावण्यात यशस्वी ठरतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs SL : टीम इंडियाचं आफ्रिकेला 327 धावांचं आव्हान, विराटची विक्रमी शतकी खेळी
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 6:29 PM

मुंबई : वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा 50 ओव्हरमध्ये 326-5 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला भारताचा विजयरथ रोखण्यासाठी 327 धावा करायच्या आहेत. भारताकडून विराट कोहली याने विक्रमी 101 धावांची नाबाद शतकी खेळी केली. श्रेयस अय्यर यानेही 77 धावांची महत्त्वाची खेळी करत महत्त्वाची भूमिका बजावली. आता भारतीय गोलंदाजांची खरी परीक्षा असलेली पाहायला मिळणार आहे.

भारताचा डाव

रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी ओपनिंगला आले होते, रोहितने सुरूवातीपासूनच आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धूर काढला होता. मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित 40 धावांवर बाद झासा, त्यापाठोपाठ शुबमन गिलसुद्धा २३ वर गेला. अय्यर आणि कोहली मैदानात असताना त्यांना स्पिनर्सने अडकवून ठेवलं होतं. दोघांनाही सिंगल डबल घेत 20 ओव्हापर्यंत सावध खेळ केला. त्यानंतर फास्टर्स आल्यावर दोघांनीही आक्रमक खेळ केला. खास करून अय्यरने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. 87 बॉलमध्ये 77 धावांवर तो बाद झाला. या खेळीममध्ये त्याने 7  चौकार आणि 2 षटकार मारले.

अय्यर मोठ फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. त्यानंतर आलेल्या के. एल. राहुल याला खास काही करता आलं नाही.  सूर्यकुमार यादव याने भारताला टॉप गिअर टाकून दिला आणि 22 धावांवर माघारी परतला. त्यानंतर शेवटपर्यंत मैदानावर टिकून असलेल्या कोहलीने आपलं 49 शतक पूर्ण करत इतिहास रचला. विराटने सचिनच्या  वनडे मधील सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

दरम्यान, भारताने दिलेल्या 327 धावांचा पाठलाग करताना आफ्रिका संघ यशस्वी ठरतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या सामन्यात भारताने विजय मिळवला तर सलग आठवा विजय असणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.