IND vs NZ | केन विलियमसन याला रनआऊट का दिलं नाही? नियम जाणून घ्या

| Updated on: Nov 15, 2023 | 9:23 PM

Kane Williamson Run Out | टीम इंडियाच्या न्यूझीलंड विरुद्धच्या 4 वर्षांआधीची रनआऊटची जखम ताजी आहे. तेव्हा धोनीला रनआऊट झाला होता. धोनी रनआऊट झाल्याने टीम इंडियाचं फायनचं स्वप्न अधुर राहिलं. आता केएल राहुल याने केनला रन आऊट आयती संधी एका प्रकारे गमावली. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

IND vs NZ | केन विलियमसन याला रनआऊट का दिलं नाही? नियम जाणून घ्या
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं आहे. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 397 धावा केल्या. त्यानंतर बॅटिंगसाठी न्यूझीलंड टीम मैदानात आली. न्यूझीलंडने सावध सुरुवात केली. मात्र त्यानंतर मोहम्मद शमी याने न्यूझीलंडने 2 झटके दिले. शमीने डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रवींद्र या दोघांना आऊट केलं. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 7.4 ओव्हरमध्ये 2 बाद 39 अशी स्थिती झाली.

त्यानंतर केन विलियमनस आणि डॅरेल मिचेल या दोघांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. त्यामुळे टीम इंडिया् तिसऱ्या विकेटच्या शोधात होती. केन विलियमसन याला रनआऊट न देण्यावरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. न्यूझीलंडच्या डावातील 18 व्या ओव्हरमध्ये केन विलियमसन रनआऊट होता होता वाचला. केन क्रीजजवळ पोहचण्याआधीच स्टंप्सवरील बेल्सची लाईट पेटली. मात्र त्यानंतरही केनला नॉटआऊट देण्यात आलं.

केनच्या रनआऊटचा रिप्ले करण्यात आला. या रिप्लेमध्ये केनच्या बॅटआधीच स्टंप लाईट पेटल्याचं स्पष्ट झालं. मात्र स्लोमोशनमध्ये पाहिल्यानंतर विकेटकीपर केएल राहुल याचा हात स्टंपला लागल्याचं समोर आलं. त्यामुळे बॉलआधी केन क्रीझमध्ये पोहचला. त्यामुळे केनला नॉट आऊट देण्यात आलं.

न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन | केन विल्यमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (विकेटकीपर), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट.

टीम इंडिया प्लेईग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.