Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2023-2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचं वेळापत्रक आणि टीम अशी असणार, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला दोन वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. पहिल्या पर्वात न्यूझीलंड आणि दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने पराभवाचं पाणी पाजलं आहे. असं असताना नव्या उमेदीने भारतीय संघ 2023-2025 स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.

WTC 2023-2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताचं वेळापत्रक आणि टीम अशी असणार, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
WTC 2023-2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारत पुन्हा एकदा सज्ज, वेळापत्रक आणि टीम इंडियातील बदलाबाबत जाणून घ्याImage Credit source: ICC
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 7:13 PM

मुंबई : टीम इंडियाने भारतीय क्रीडाप्रेमींची निराशा करण्याचं सत्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही कायम ठेवलं आहे. गेल्या दहा वर्षात भारतीय संघाला एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे पराभूत मानसिकतेमुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी आतापासूनच खलबतं सुरु झाली आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023- 2025 साठी भारतीय संघ सहा कसोटी मालिका खेळणार आहे. या सामन्यातील पहिला कसोटी टूर वेस्ट इंडिजमध्ये जुलै 2023 मध्ये असणार आहे. 12 जुलैपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना 12 जुलै ते 16 जुलै आणि दुसरा कसोटी सामना 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान असणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत तीन कसोटी मालिका विदेशात, तर तीन कसोटी मालिका भारतात खेळणार आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ जाणार आहे. तर इंग्लंडसोबत 5 कसोटी सामन्यांची, बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची आणि न्यूझीलंडविरूद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका भारतात खेळणार आहे.

  • डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
  • जानेवारी 2024 ते फेब्रुवार 2024 दरम्यान इंग्लंडसोबत मायदेशात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.
  • सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान बांगलादेशसोबत मायदेशात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.
  • ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान न्यूझीलंडसोबत मायदेशात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.
  • नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान 5 कसोटी सामन्यांची मालिका भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये खेळणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 मध्ये असा असेल बदल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून आता नव्या खेळाडूंना संघात स्थान दिलं जाणार आहे. रोहित शर्माच्या फिटनेस पाहता आता त्याला संघात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे. 2021-2023 मध्ये रोहित शर्मा 18 पैकी 8 कसोटी सामने खेळला नव्हता. त्यात तो आता 36 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात यशस्वी जयस्वाल किंवा अभिमन्यू ईश्वरन यांना संधी मिळू शकते.

चेतेश्वर पुजाराचाही पत्ता कापला जाऊ शकतो. त्याच्याऐवजी संघात ऋतुराज गायकवाड किंवा सरफराज खानला संधी मिळू शकते. दुसरीकडे, विराट कोहलीची जागा भरून काढणं सोपं नाही. त्यामुळे ही जागा भरण्यासाठी अधूनमधून श्रेयस अय्यर, केएल राहुल किंवा सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते.

उमेश यादवची कामगिरी एकदमच निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याऐवजी संघात अर्शदीप सिंग किंवा मुकेश कुमारला संधी मिळण्याची शक्यता आहे. आर. अश्विनचा जागा भरून काढणं देखील सोपं नाही. त्यामुळे त्याला दोन वर्षे आणखी संधी मिश शकते.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.