ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली तर भारत WTC अंतिम फेरी गाठणार, कसं ते समजून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पण टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठणार की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. कोणतं समीकरण जुळलं की भारत अंतिम फेरी गाठेल? चला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी शेवटचा टप्पा सुरु आहे. अंतिम फेरीच्या शर्यतीत अजूनही कोणाचंच नाव निश्चित नाही. न्यूझीलंडकडून भारताला 3-0 ने मात खावी लागली होती. त्यामुळे भारताचं गणित फिस्कटलं आहे. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे लक्ष लागून होतं. दुसरीकडे, इंग्लंडने पहिल्याच कसोटी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केलं आणि न्यूझीलंडचं गणित कठीण केलं.त्यात स्लो ओव्हररेटमुळे विजयी टक्केवारीतून 3 गुण कापले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडला आता अंतिम फेरी गाठणं खूपच किचकट आहे. दुसरीकडे, अंतिम फेरीच्या शर्यतीत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात चुरस असणार आहे. त्यात श्रीलंकेचं अंतिम फेरी गाठणं खूपच कठीण आहे. त्यामुळे भारताने उर्वरित चार सामन्यात काय केलं तर अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. चला तर जाणून घेऊयात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित
- भारताने ऑस्ट्रेलियाला 5-0, 4-1, 4-0 किंवा 3-0 ने पराभूत केलं तर अंतिम स्थान पक्कं होईल. यासाठी कोणत्याही समीकरणावर अवलंबून राहावं लागणार आहे. मग दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका या संघात चुरस असेल. भारताचं वरचं समीकरण जुळून अलां तर भारत तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठेल.
- भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-1 ने जिंकली तर श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका सामन्याकडे नजर ठेवावी लागेल. दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला दुसऱ्या सामन्यात पराभूत केलं तर भारताचं गणित जर तर वर येईल. पण श्रीलंकेने दक्षिण अफ्रिकेला हरवलं तर वरच्या समीकरणात अंतिम फेरी गाठेल.
- भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-2 ने जिंकली तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप अंतिम फेरी गाठू शकते. फक्त श्रीलंकने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक सामना ड्रॉ केला पाहीजे.
- बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली तरीही भारत अंतिम फेरी गाठू शकते. फक्त दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला 2-0 पराभूत करावं. तसेच श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला मालिकेत 1-0 ने पराभूत करावं.
भारताने दोनदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठली आहे. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली आहे. पहिल्या वेळेस न्यूझीलंडने आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं आहे. आता तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणार का? असा प्रश्न आहे.