कसोटी आणि वनडे खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, टी-20 मालिका स्थगित

भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे पण केवळ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी-20 मालिका नंतर खेळवली जाईल. अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे.

कसोटी आणि वनडे खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, टी-20 मालिका स्थगित
indian cricket team
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 12:47 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे पण केवळ कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी-20 मालिका नंतर खेळवली जाईल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत फक्त तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामने खेळणार आहे तर टी-20 मालिका नंतर आयोजित केली जाईल. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे या दौऱ्यावर काळे ढग दाटून आले होते, हा दौरा पुढे ढकलला जाईल किंवा रद्द केला जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु बीसीसीआयने काही बदल करून हा दौरा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ टी-20 मालिका पुढे ढकलली आहे. (India to tour South Africa for 3 Tests and 3 ODIS, T20Is to be played later says Jay Shah)

भारताचा हा दौरा 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जय शाह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “बीसीसीआयने सीएसएला सांगितले आहे की, भारतीय संघ तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करेल. त्याचवेळी चार सामन्यांची टी-20 मालिका नंतर खेळवली जाईल.

प्रेक्षकांविना सामने खेळवले जाणार

या दौऱ्यातील सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जातील, असेही पीटीआयने आपल्या वृत्तात सांगितले होते. सीएसएसाठी भारताचा हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. कारण या दौऱ्यातून सीएसएला टीव्ही हक्कांद्वारे कोट्यवधी रुपयांची कमाई होणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की, सीएसएने तयार केलेला बायो बबल सुरक्षित आहे. तसेच, हा विषाणू किती धोकादायक आहे हे सांगू शकेल असा कोणताही डेटा आतापर्यंत उपलब्ध नाही. तसेच या दौऱ्याबाबत सरकारकडून आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाही. टीम लवकरच बायो बबलमध्ये प्रवेश करेल आणि चार्टर फ्लाइटने निघून जाईल. जरी विलंब झाला तरी, ते बबल टू बबल ट्रान्सफर असेल.

इतर बातम्या

IND vs NZ : एजाज पटेलचा ‘चौकार’, मयंक अग्रवालचं शतक, टीम इंडियाची दिवसअखेर 4 बाद 214 पर्यंत मजल

IND vs NZ | सुमार कामगिरी की दुखापत, लोकल बॉय रहाणेच्या डच्चूमागील कारण काय?

IND vs NZ, 2nd Test, Day 2, Live Score: भारत 250 पार, मयंक-अक्षर मैदानात

(India to tour South Africa for 3 Tests and 3 ODIS, T20Is to be played later says Jay Shah)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.