IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्माबाबत मोठी अपडेट! नक्की काय?
Rohit Sharma Team India: टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याची 27 जुलैपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. त्याआधी रोहित शर्माबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर रोहित, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडच्या झिंबाब्वे दौऱ्यानंतर सिनिअर टीम श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज आहे. उभयसंघात या दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज होणार आहे. रोहितसाठी या दौऱ्यात वनडे सीरिजचाच एकमेव पर्याय आहे, कारण त्याने टी 20 मधून निवृत्ती घेतली आहे. रोहित या वनडे सीरिजमध्ये खेळणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता रोहितबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
क्रिकबझच्या रिपोर्ट्नुसार, रोहित श्रीलंका विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी उपलब्ध असेल. बीसीसीआय निवड समिती लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. त्यामुळे जर रोहित वनडे सीरिज खेळणार असेल, तर त्यालाच नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. गौतम गंभीर हेड कोच म्हणून श्रीलंका दौऱ्यापासून सूत्रं सांभाळणार आहे. त्याआधी गंभीरने अनुभवी खेळाडूंनी वनडे सीरिजमध्ये खेळावं, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर रोहितबाबतची मोठी अपडेट आली आहे. तसेच श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांचंही वनडे सीरिजमधून टीम इंडियात कमबॅक होण्याची शक्यता आहे.
बुमराह-विराटला विश्रांती!
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे मोजकेच एकदिवसीय सामने आहेत. त्यामुळेच रोहित श्रीलंके विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध केल्याचीही शक्यता आहे. मात्र विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दोघांना एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांचं पुनरागमन होण्याची शक्यता अधिक आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला 27 जुलैपासून टी 20 मालिकेने सुरुवात होणार आहे. तर त्यानंतर वनडे सीरिज पार पडणार आहे. दोन्ही मालिका 3-3 सामन्यांच्या आहेत.
रोहित शर्मा वनडे सीरिजसाठी उपलब्ध!
Rohit Sharma may make himself available for the ODI series against Sri Lanka. [Cricbuzz] pic.twitter.com/3DimibvIB3
— Johns. (@CricCrazyJohns) July 17, 2024
दरम्यान रोहितच्या निवृत्तीनंतर आता टी 20 मध्ये टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी कुणाला मिळणार? अशीही चर्चा आहे. कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव याचं नाव आघाडीवर आहे. हार्दिक पंड्याच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र सूर्या कॅप्टन्सीसाठी प्रबळ दावेदार आहे. आता कर्णधारपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.