मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी टेस्ट सीरीजसाठी शुक्रवारी टीम जाहीर करण्यात आली. यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार यांची कसोटी संघात निवड झाली आहे. सिलेक्टर्सनी जाहीर केलेल्या टीमवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालय. कारण टेस्ट टीममध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या काही खेळाडूंना वगळण्यात आलय. यात एक नाव आहे सर्फराज खान. मुंबईच्या या खेळाडूने रणजी मोसमात जबरदस्त प्रदर्शन केलय.
प्रत्येकवेळी टेस्टसाठी टीम निवडताना सर्फराज खानच नाव चर्चेत येतं. पण त्याला संधी मिळत नाही. मागच्या, मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मालिकेच्यावेळी सुद्धा हेच झाला. आता वेस्ट इंडिज विरुद्ध टीम निवडतानाही परिस्थिती बदलली नाही.
13 सेंच्युरी करुनही दुर्लक्ष
सर्फरान खानने आता त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून सिलेक्टर्सना संदेश दिलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराज खानने सातत्यपूर्ण प्रदर्शन केलय. 2019-20 च्या सीजनमध्ये त्याने 154 च्या सरासरीने त्याने 928 धावा केल्या. त्यानंतरच्या सीजनमध्ये त्याने 122.75 च्या सरासरीने 982 धावा केल्या. 2022/23 मध्ये त्याने 556 धावा केल्या. यात तीन सेंच्युरी होत्या. सर्फराज खानने आतापर्यंत 35 इनिंगमध्ये 79.65 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. यात 13 सेंच्युरी आहेत.
त्याने त्याचे इरादे दाखवून दिलेत
इतका दमदार परफॉर्मन्स असूनही सर्फराज खान टीम इंडियात संधी कधी मिळणार? त्याची प्रतिक्षा करतोय. सर्फराजची निवड झाली नाही म्हणून त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रणजी ट्रॉ़फी सीजनमधला हायलाइटचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्याने या व्हिडिओला कुठलही कॅप्शन दिलेलं नाही. पण व्हिडिओला जे म्युजिक आणि गाणं आहे, त्यातून त्याने त्याचे इरादे दाखवून दिलेत.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सुद्धा संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. त्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला. “मागच्या तीन सीजनमध्ये सर्फराजने 100 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. टीममध्ये निवड होण्यासाठी अजून त्याने काय करायच? तो प्लेइंग 11 मध्ये नसेल, पण तुम्ही त्याला टीममध्ये निवडू शकता” असं गावस्कर स्पोर्ट्स टुडेवर म्हणाले.
Sarfaraz Khan’s latest Instagram Story after he wasn’t selected for West Indies Tests. ???? pic.twitter.com/ITzJMl7QUD
— Harshit Bisht (@rk_harshit29) June 25, 2023
“तुझ्या कामगिरीची आम्ही दखल घेतो, हे त्याला सांगा. अन्यथा रणजी खेळणं थांबवा, त्याचा काही उपयोग नाही. फक्त आयपीएल खेळा म्हणजे तुम्ही कसोटी सामनेही खेळू शकता” अशा शब्दात गावस्करांनी आपला संताप व्यक्त केला.